Parner Assembly Constituency | मविआ मेळाव्यात विखेंविरोधात निलेश लंकेंचा हल्लाबोल; म्हणाले – ’50 वर्षांच्या सत्तेला सुरूंग लागल्याचे 23 तारखेला समजले पाहिजे”

Nilesh Lanke

अहिल्यानगर: Parner Assembly Constituency | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या एका मेळाव्यात बोलताना खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी विखेंवर (Vikhe Patil) निशाणा साधला आहे.

“स्वाभीमानीचा लढा लढू या. दहशतीला गाडू या, कायमचे गाडू या. गणेश सहकारी साखर कारखान्यातून याचा श्रीगणेशा झाला आहे. जगन्नाथाचा रथ अविरत पुढे चालला आहे. त्या रथाच्या चालक प्रभावती घोगरे आहेत. विधिमंडळात ही वाघीण गरजणार आहे. एक वर्षापासूनच जीभ घसरायला सुरू झाली. काही कार्यकर्ते भेटले आणि सांगितले की, आम्ही विखेंचे कार्यकर्ते, पण आता त्यांची जिरवा. इतिहास बदलणारे आम्ही आहोत, जनतेन ठरवले तर बदल घडतो”, अशा शब्दांत निलेश लंके यांनी भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

निलेश लंके म्हणाले, ” म्हणे आम्ही सुसंस्कृत आहोत. बाळासाहेब थोरात राज्यातील सुसंस्कृत नेते आहे. पण, यांचे विचारच घाणरडे आहेत, कसला टायगर… कसला वाघ… मांजरीने वाघाचे झुल अंगावर पांघरल्याने तो वाघ होत नाही. घाबरू नका, अभी नहीं तो कभी नहीं. आम्हाला उलटे पाढे मोजता येतात. आमच्यावर थोरात आणि पवार यांचे संस्कार आहेत, असे म्हणत निलेश लंके यांनी विखेंवर टीकास्त्र सोडले.

ते पुढे म्हणाले, ” ही परिवर्तनाची निवडणूक आहे. महाविकास आघाडीचे चिन्ह घराघरात पोहोचवा.
शिर्डी मतदारसंघात प्रभावती घोगरे ५० हजार मतांनी विजयी होणार आहेत.
५० वर्षांच्या सत्तेला सुरूंग लागला, हे २३ तारखेला सर्वांना समजले पाहिजे.
बारकाईने सर्व लक्ष द्यावे लागेल, घाबरायचे नाही. मला इंग्रजी जरा कमी येते,
पण मी इंग्रजीतून शपथ घेतली अन् ती गाजली “, असे निलेश लंके यांनी म्हटले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Baramati Assembly Election 2024 | ‘बारामतीकर युगेंद्र पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील’, युगेंद्र पवारांच्या उमेदवारीवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले – ‘बारामतीकरांची मला जेवढी माहिती आहे त्यानुसार…’

Maval Assembly Election 2024 | मावळ विधासभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी; यंदाची निवडणूक रंगतदार होणार

Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP | पुण्यातील 21 पैकी 8 जागांवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांना भिडणार;
कोणत्या पवारांची पॉवर निर्णायक ठरेल? राजकीय वर्तुळात चर्चा

You may have missed