Sharad Pawar NCP | राष्ट्रवादी शरद पवार गटाची चौथी यादी जाहीर; दौंड मधून रमेश थोरात, काटोल मधून सलील देशमुख, खानापूर मधून वैभव पाटील निवडणुकीच्या रिंगणात

पुणे: Sharad Pawar NCP | राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अनेक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अशात दौंड तालुक्यात मात्र ‘वेट ॲण्ड वॉच’चं चित्र पाहायला मिळत होतं. भाजपकडून विद्यमान आमदार राहुल कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत चित्र स्पष्ट होत नव्हतं. मात्र आता दौंडमधून रमेश थोरात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी, महायुती, तसेच इतर पक्षांकडूनही उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. उद्या (दि.२९) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान आज (दि. २८) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ७ जणांच्या नावाचा समावेश आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाची चौथी यादी खालीलप्रमाणे,
माण- प्रभाकर घार्गे
काटोल- सलील देशमुख
खानापूर- वैभव पाटील
वाई- अरुणादेवी पिसाळ
दौंड- रमेश थोरात
पुसद- शरद मेंद
सिंदखेडा- संदीप बेडसे
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maval Assembly Election 2024 | मावळ विधासभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी; यंदाची निवडणूक रंगतदार होणार
Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP | पुण्यातील 21 पैकी 8 जागांवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांना भिडणार;
कोणत्या पवारांची पॉवर निर्णायक ठरेल? राजकीय वर्तुळात चर्चा