Maval Assembly Election 2024 | मावळात बाळा भेगडेंची चाणक्यनीती चर्चेत; सुनील शेळकेंच्या पराभवासाठी आखली व्यूहरचना

Sunil Shelke - Bapu Bhegade

मावळ: Maval Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून (Mahayuti) राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) आमदार सुनील शेळके (Sunil Shelke MLA) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर पक्षातीलच बापू भेगडे (Bapu Bhegade) यांनी राजीनामा देत सुनील शेळकेंविरोधात दंड थोपटले आहेत. महायुतीचे नेते बाळा भेगडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील राजीनामा देत बापू भेगडे या अपक्ष उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. (Maval Assembly Election 2024)

दुसरीकडे महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) या मतदारसंघात उमेदवार न देता बापू भेगडे यांना पाठिंबा दिला. बापू भेगडे यांना भाजपचे नेते मदत करीत असल्यामुळे निवडून आल्यानंतर बापू भेगडे भाजपला पाठिंबा देतील की महाविकास आघाडीला पाठिंबा देतील हे गुलदस्त्यात आहे. मात्र निवडून आल्यानंतर बापू भेगडे कोणत्या दिशेने जाणार हे येणारा काळच ठरवणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांचे समर्थक असलेल्या बापू भेगडे यांना अपक्ष म्हणून
निवडणूक रिंगणात उतरवून त्यांच्यामागे सर्व शेळके
विरोधकांची एकत्रित ताकद उभी करण्याची चाणक्यनीती बाळा भेगडेंची असल्याची चर्चा आहे.
मतदारसंघातील गुन्हेगारी, टक्केवारी पद्धत मोडून काढण्यासाठी आम्ही सर्व एकत्र येत शेळकेंचा
पराभव करीत असल्याचे येथील पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | २८८ मतदार संघात ७ हजार ९९५ उमेदवारांचे जवळपास १० हजार ९०५ उमेदवारी अर्ज दाखल; सर्वाधिक उमेदवारी अर्ज कोणत्या मतदारसंघात? ‘या’ मतदारसंघात अवघे ९ उमेदवारी अर्ज

Chinchwad Assembly Election 2024 | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल; वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी

Katraj Pune Crime News | कात्रजमध्ये गुंडांचा हैदोस ! तरुणांना मारहाण करुन रिक्षा, कारच्या काचा फोडून माजवली दहशत

Maharashtra Assembly Election 2024 | केवळ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून शासनाने कमविले किमान 43 लाख 62 हजार रुपये जादा

You may have missed