Vadgaon Sheri Assembly Election 2024 | राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात वाढतोय तरुणाईचा कल ! बापूसाहेब पठारे यांच्या उपस्थितीत तरुणांचा पक्ष प्रवेश
खराडी (पुणे) : Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांच्या उपस्थितीत काही तरुणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात (Sharad Pawar NCP) जाहीर प्रवेश केला. शरद पवार यांच्या कार्यकर्तृत्वाने तसेच बापूसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाने व कामाने प्रेरित होऊन प्रवेश घेतल्याचे सांगण्यात आले. खराडी येथे हा पक्ष प्रवेश पार पडला.
ऋतिक साठे, विशाल साठे, अक्षय खांदवे ,शशांक खांदवे, समीर कोल्हापुरे ,अक्षय साठे, ओम साठे, माऊली साठे, पांडुरंग साठे, उमेश साठे, चेतन साठे, ओम पवार यांनी यावेळी प्रवेश घेतला.
तरुण वर्गाच्या प्रवेशाने मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची ताकद वाढलेली दिसून येते. “पूर्वी आम्हाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी किंवा कारकीर्द नव्हती. आमच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या विचारधारेचा प्रभाव पडला आहे. याचे कारण म्हणजे तरुणाईच्या उज्ज्वल भविष्यासाठी या पक्षाकडे ठोस उपाययोजना आहेत. ज्याचा सध्याच्या सरकारमध्ये प्रचंड प्रमाणात अभाव दिसून येतो”, असे यावेळी तरुणांनी सांगितले.
बापूसाहेब पठारे यांनी तरुण सहकाऱ्यांचे स्वागत करतेवेळी ते म्हणाले, “तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर पक्षात येतोय. येणाऱ्या काळात लोहगाव, खराडी, चंदननगर, विमाननगर, धानोरी, विश्रांतवाडी व एकूणच वडगावशेरी मतदारसंघातील तरुणाईच्या रोजगार निर्मितीसाठी प्राधान्याने काम करायचे आहे. तसेच, रखडलेला विकास जलद गतीने करण्यास मी तत्पर असेल.” यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल साठे, हनुमंत साठे, निलेश पवार, सचिन आबा खांदवे, मच्छिंद्र शिंदे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chinchwad Assembly Election 2024 | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल; वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी
Katraj Pune Crime News | कात्रजमध्ये गुंडांचा हैदोस ! तरुणांना मारहाण करुन रिक्षा, कारच्या काचा फोडून माजवली दहशत
Maharashtra Assembly Election 2024 | केवळ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून शासनाने कमविले किमान 43 लाख 62 हजार रुपये जादा