Yerawada Pune Crime News | पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्करी जवानाने बंदुकीतून गोळीबार करुन केले जखमी; येरवड्यातील घटना (Video)

पुणे : Yerawada Pune Crime News | जुन्या चार चाकी गाडीच्या पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्करी जवानाने बंदुकीतून गोळीबार करुन शेजारी राहणार्या तरुणाला जखमी केले. येरवडा पोलिसांनी (Yerawada Police) या लष्करी जवानाला अटक केली आहे. (Firing In Yerawada Pune)
https://www.instagram.com/reel/DB0PiuAJNF7/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
श्रीकांत शामराव पाटील Shrikant Shyamrao Patil (वय ४५, रा. श्रीराम मित्र मंडळ, अशोकनगर, येरवडा – Ashok Nagar Yerawada ) असे या लष्करी जवानाचे नाव आहे. याबाबत दिलशाद शहानवाज मुलानी (वय ३३, रा. श्रीराम मित्र मंडळ, अशोकनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना गुरुवारी रात्री पावणे अकरा वाजता श्रीराम मित्र मंडळ येथे घडली. या घटनेत शहानवाज मुलानी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहानवाज मुलानी आणि श्रीकांत पाटील हे शेजारी शेजारी राहतात. त्यांच्यामध्ये जुन्या चार चाकी गाडीच्या पार्किंगवरुन वाद होत असे. गुरुवारी रात्रीही त्यांच्यात याच कारणावरुन वाद झाला. तेव्हा श्रीकांत पाटील घरातून १२ बोअरची बंदुक घेऊन आला.
त्याने बंदुकीतून शहानवाज मुलानी यांच्यावर डोक्यावर गोळी मारुन गंभीर जखमी केले आहे.
त्यानंतर मुलानी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.
पोलिसांनी श्रीकांत पाटील याला अटक केली आहे़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके (PI Ravindra Shelke)
तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा