Maharashtra Assembly Election 2024 | देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले – ‘मुख्यमंत्री शिंदेंनी परवानगी दिली तर मनसेसोबत काही जागांवर युती…’

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भाजपला (BJP) बिनशर्त पाठिंबा दिला होता. तसेच, राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांसाठी (Mahayuti Candidate) राज्यात सभाही घेतल्या होत्या. दरम्यान आता आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेला जवळपास ११० मतदारसंघांसाठी उमेदवार दिले आहे. राज ठाकरे यांच्याकडून एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली जात आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी पेच निर्माण झाल्याचं चित्र आहे. अशातच भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मनसेबरोबर आम्ही एक- दोन जागांवर मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने युती करू शकतो, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” राज ठाकरे हे आमचे मित्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका वेगळी आहे, त्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे ते महायुतीत येतील असा स्कोप देखील नाही. त्यांचे उमेदवार ते परत देखील घेणार नाहीत. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत आम्ही समोरा-समोर लढत आहोत.
ते पुढे म्हणाले,” आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संमतीने एक-दोन ठिकाणी त्यांना मदत करणं, किंवा युती करू शकतो. उदाहरणार्थ शिवडीसारखी जागा आहे. ज्याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भूमिका घेतली आहे. आम्ही महायुतीमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि छोटे मोठे पक्ष आहेत. विधानसभेत महायुतीचाच विजय होईल आणि महायुतीचा मुख्यमंत्री होईल, असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा