Maharashtra Assembly Election 2024 | ‘बंडखोरी केलेले अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार अर्ज मागे घेतील’, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
पुणे: Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. ४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी महायुतीत (Mahayuti) बंडखोरी झाल्याचे चित्र आहे. भाजपचे (BJP) तसेच शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group) अधिकृत उमेदवार असताना मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar NCP) गटाने एबी फॉर्म देत उमेदवार दिले आहेत. त्यामुळे महायुतीत वादंग निर्माण झाला आहे.
दरम्यान ही बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) त्याबाबत उमेदवारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. बंडखोरीचा फटका रोखण्यासाठी आज फडणवीस पुण्यात आले होते. दरम्यान माध्यमांशी बोलताना बंडखोरीबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” ज्या ठिकाणी अजित पवार यांच्या पक्षाने एबी फॉर्म दिले आहेत. त्याठिकाणी ते उमेदवार मागे घेणार अशी मला अपेक्षा आहे”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा