Parvati Assembly Election 2024 | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) कडून अश्विनी कदम यांना जाहीर पाठिंबा; पर्वती मतदारसंघात अश्विनी कदम यांची ताकद वाढली
पुणे: Parvati Assembly Election 2024 | पर्वती विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडून अश्विनी नितीन कदम (Ashwini Nitin Kadam), महायुतीकडून माधुरी मिसाळ (Madhuri Misal), आणि अपक्ष उमेदवार म्हणून आबा बागुल (Aba Bagul) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तिन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे.
दरम्यान काल (दि.८) पर्वती विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A आंबेडकर)चे अध्यक्ष दिपक निकाळजे यांनी अश्विनी कदम यांना अधिकृतरित्या पाठिंबा दिला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A आंबेडकर) पाठिंबा दिल्यानंतर अश्विनी कदम म्हणाल्या, “लोकप्रतिनिधी हा अशाच अनेक संघटना मिळून, मोठा होत असतो, यामुळे अनेक लोक जोडले जातात आणि नागरिकांची कामं करण्याचे समाधान मिळते. “
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A आंबेडकर) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे, पुणे शहर अध्यक्ष अशोक जगताप, पुणे शहर कार्याध्यक्ष जावेद शेख, पुणे शहर उपाध्यक्ष अजिज तांबोळी, पुणे शहर सचिव बसवराज होळीकेरी, पश्चिम महाराष्ट्र संघटक मच्छिंद्र बनसोडे आदी उपस्थित होते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Kothrud Assembly Election 2024 : दादा… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!
Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ – सुप्रिया सुळे (Video)