Bhor Assembly Election 2024 | भोरमध्ये संग्राम थोपटे यांना धक्का ! काँग्रेसच्या सतीश चव्हाणांच्या हातावर अजितदादांचे घड्याळ
भोर : Bhor Assembly Election 2024 | भोर विधानसभेत काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांना जोरदार धक्का बसलाय. भोरचे काँग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य व थोपटे यांचे कट्टर समर्थक सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी काँग्रेसला रामराम करत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar NCP) राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
छत्रपती संभाजीनगर मध्ये झालेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. सतीश चव्हाण यांच्या प्रवेशामुळे भोर विधानसभेत काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. विद्यमान आमदारांची एकाधिकारशाही, मनमानी कारभार व तालुक्याचा रखडलेला विकास यामुळे चव्हाण यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्याचा मोठा फटका थोपटे यांना बसणार आहे.
सलग पंधरा वर्षे मतदार संघातील सत्ता हातात ठेवताना विद्यमान आमदार पक्षातील इतर सहकाऱ्यांना विश्वासात न घेता काम करत असल्याने, त्यांच्याबद्दल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे. या नाराजीला वाट करून देत चव्हाण यांनी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केलाय.
भोर काँग्रेसमध्ये संग्राम थोपटे व त्यांचा मुलगा पृथ्वीराज यांच्या कार्यशैलीबद्दल प्रचंड खदखद आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भोर मध्ये होणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभेत काँग्रेस मधील
कार्यकर्त्यांचा मोठा गट राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश करणार आहे.
त्यामुळे या निवडणुकीत भोर विधानसभेत परिवर्तन नक्की होणार, असे महायुतीचे पदाधिकारी सांगत आहेत. (Bhor Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | हातचलाखीने दागिन्यांच्या दुकानात चोरी करणारे बंटी व बबली पोलिसांच्या जाळ्यात !
पुण्यासह मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस (Video)
Maharashtra Assembly Election 2024 | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले –
‘पक्ष फोडणाऱ्यांना आणि चिन्ह पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही’