Sharad Pawar On Dilip Mohite Patil | शरद पवारांकडून आमदार दिलीप मोहिते पाटलांचा खरपूस समाचार ; म्हणाले – “खेडच्या नेतृत्वाने दमदाटी करत… “

Sharad Pawar - Dilip Mohite Patil

खेड: Sharad Pawar On Dilip Mohite Patil | खेड-आळंदी विधानसभेचे शिवसेना (उबाठा) पक्षाचे अधिकृत उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची राजगुरुनगर येथील बाजार समितीच्या आवारात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत शरद पवार यांनी आपल्या भाषणात आमदार दिलीप मोहिते- पाटील यांचे नाव न घेता खरपूस समाचार घेतला. (Khed Alandi Assembly Election 2024)

शरद पवार म्हणाले, ” या तालुक्याचा नावलौकिक खूप चांगला होता. येथून अनेक चांगले खासदार, आमदार निवडून गेले. पण आमची चूक झाली व तीन टर्म आम्ही येथील नेतृत्वाला निवडून दिले. आता ही चूक करू नका. तालुक्याला, जिल्ह्याला प्रकाशाची वाट दाखवण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी बाबाजी काळे यांच्या हातात मशाल दिली असून, २० नोव्हेंबरला मशालीसमोरील बटण दाबून परिवर्तन घडवून आणा”, असे आवाहन देखील शरद पवार यांनी केले. (Maharashtra Assembly Election 2024)

ते पुढे म्हणाले, ” हुतात्मा राजगुरू, निवृत्त सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासारख्या अनेक कर्तृत्ववान लोकांमुळे खेड तालुक्याचा नावलौकिक देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. पण येथील नेतृत्वाने दहशतवाद व दमदाटी करत तालुक्यातील सर्व उद्योगधंदे करणाऱ्यांना हैराण करत दूषित वातावरण निर्माण केले.

पण बाबाजी काळे यांच्या रूपाने सर्वांना बरोबर घेऊन जाणारे सुसंस्कृत नाव आमच्यापुढे आले. त्यामुळे उध्दव ठाकरे आणि आम्ही त्यांची उमेदवारी जाहीर केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Baba Siddique Murder | बाबा सिद्दिकींची हत्या केल्यानंतर मारेकरी पसार न होता लीलावती रुग्णालयातच… , पोलीस चौकशीत मोठा खुलासा

Pune Crime News | हातचलाखीने दागिन्यांच्या दुकानात चोरी करणारे बंटी व बबली पोलिसांच्या जाळ्यात !
पुण्यासह मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस (Video)

Maharashtra Assembly Election 2024 | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले –
‘पक्ष फोडणाऱ्यांना आणि चिन्ह पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही’

You may have missed