Sharad Pawar On Raj thackeray | जातीयवादाच्या टीकेवर शरद पवारांचे राज ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले – ‘कुणीतरी मूर्खासारखं काहीही बोलत असेल तर…’
मुंबई: Sharad Pawar On Raj thackeray | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Election 2024) सर्वच पक्षाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. लोकसभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता विधानसभा त्यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे.
दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यभर उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत. यामधून ते सातत्याने शरद पवार यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. शरद पवारांनी जातीयवाद पसरवला, फोडाफोडी केली म्हणत राज ठाकरे निशाणा साधत आहेत.
राज ठाकरे म्हणाले, “शरद पवारांच्या जातीयवादाचे अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकी एक सांगतो. पुण्यात एका कार्यक्रमात शरद पवारांना लोकमान्य टिळकांची पुणेरी पगडी घालण्यात आली. मात्र, त्यांनी ती काढली आणि ज्योतिबा फुले यांची पगडी घातली. खरे तर ती पगडी घालण्याला माझा विरोध नाही. पुणेरी पगडी न वापरता फुलेंची पगडी घालत जा,असे म्हणणे याला माझा विरोध आहे. हा एकप्रकारे जातीयवाद आहे” असे राज ठाकरे यांनी म्हंटले.
याबाबत माध्यमांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला असता राज ठाकरे मूर्खासारखं बोलतात म्हणत टोला लगावला आहे. शरद पवार म्हणाले, ” कुणीतरी मूर्खासारखं काहीही बोलत असेल तर त्याची नोंद कशासाठी घ्यायची? जातीयवाद मी केला असेल तर मला एक उदाहरण दाखवा.
माझ्या नेतृत्वात जो पक्ष चालत होता, कधीकाळी शासनही चालत होतं. त्यावेळचे निर्णय बघा. आम्ही कुणाला प्रोत्साहन दिलं. त्यावेळी आमच्या पक्षामध्ये विधीमंडळात नेतृत्व करायची निवड करायची संधी आली होती तेव्हा आम्ही कुणाला निवडलं तेदेखील बघा.
मधुकर पिचड यांना नेता बनवलं. छगन भुजबळ यांना नेता बनवलं. मी २५ लोकांची यादी देऊ शकतो की जे विविध जाती-जमातीचे होते. आदिवासी, दलित, ओबीसी सगळ्यांची नेमणूक आम्ही केली होती. आमची भूमिका कायम व्यापकच होती.
राज ठाकरे नावाचे गृहस्थ जे काही बोलत आहेत त्याला आधार काय आहे मला माहीत नाही. काहीही ठोकून द्यायचं. दहावेळा एखादी गोष्ट बोलली तर लोकांना वाटतं की काहीतरी असावं बाबा. त्यामुळेच राज ठाकरे आरोप करत असावेत. “
ते पुढे म्हणाले, ” पुणेरी पगडीबाबत जे काही राज ठाकरे बोलले तो कार्यक्रम महात्मा फुलेंचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात महात्मा फुलेंची पगडी मलाही घालण्यात आली. मी जरी म्हटलं की ही टोपी घाला, फुले पगडी वापरा त्याचा आनंद आहे तर मी जातीयवादी कसा? महात्मा फुलेंनी कधीही जातीयवाद केला नाही. आमच्यासाठी महात्मा फुले, त्यांचा विचार आम्ही अंगिकारतो. लगेच आम्हाला जातीयवादी कसं काय म्हणायचं? याला काही फारसा अर्थ नाही”, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Baba Siddique Murder | बाबा सिद्दिकींची हत्या केल्यानंतर मारेकरी पसार न होता लीलावती रुग्णालयातच… , पोलीस चौकशीत मोठा खुलासा
Pune Crime News | हातचलाखीने दागिन्यांच्या दुकानात चोरी करणारे बंटी व बबली पोलिसांच्या जाळ्यात !
पुण्यासह मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस (Video)
Maharashtra Assembly Election 2024 | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले –
‘पक्ष फोडणाऱ्यांना आणि चिन्ह पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही’