Vadgaon Sheri Assembly Election 2024 | “एक साथ एक नाद होऊ दे रे, बापूसाहेब येऊ दे पुन्हा…” नव्या गाण्याची सोशल मीडियावर क्रेझ; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बापूसाहेब पठारेंवरील गाण्याची तरुणाईला भुरळ (Video)

Bapusaheb Pathare

पुणे: Vadgaon Sheri Assembly Election 2024 | राज्यभरात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बापूसाहेब पठारे (Bapu Pathare) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पठारे यांनी खराडीमधून ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच होत आपल्या राजकीय जीवनास सुरुवात केली.

https://www.instagram.com/reel/DCWkdNophxP/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

नंतर ते पंचायत समिती, जिल्हापरिषद सदस्य आणि नंतर पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. ते स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यानंतर २००९ मध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून आमदार झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या त्यांची मोठी क्रेझ आहे.

त्यामुळेच निवडणुकीच्या निमित्ताने बापूसाहेब पठारे यांच्या चाहत्याने ‘बापूसाहेब येऊ दे पुन्हा’ हे तयार केलेले गाणं समाजमाध्यमात चांगलंच धुमाकूळ घालत आहे. “एक साथ एक नाद होऊ दे रे, बापूसाहेब येऊ दे पुन्हा, दिशा दिशा ही तुतारी घुमू दे रे, बापूसाहेब येऊ दे पुन्हा” असे या गाण्याचे सुरुवातीचे बोल आहेत. यातील शब्दांनी आणि संगीताने या गाण्यात एक अनोखी आर्तता आणली आहे. अनेकजण हे गाणं गुणगुणत आहेत. सध्या हे गाणं सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Baba Siddique Murder | बाबा सिद्दिकींची हत्या केल्यानंतर मारेकरी पसार न होता लीलावती रुग्णालयातच… , पोलीस चौकशीत मोठा खुलासा

Pune Crime News | हातचलाखीने दागिन्यांच्या दुकानात चोरी करणारे बंटी व बबली पोलिसांच्या जाळ्यात !
पुण्यासह मुंबई, सातारा, सिंधुदुर्ग, ठाण्यातील 9 गुन्हे उघडकीस (Video)

Maharashtra Assembly Election 2024 | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा; म्हणाले –
‘पक्ष फोडणाऱ्यांना आणि चिन्ह पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही’

You may have missed