Shaivaji Nagar Assembly Election 2024 | खडकी व्यापारी संघटनेसोबत मनिष आनंद यांची चर्चा; समस्या सोडविण्याचे दिले आश्वासन

Manish Anand

पुणे : Shaivaji Nagar Assembly Election 2024 | छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनिष आनंद (Manish Anand) यांच्या प्रचाराला वेग आला आहे. शिवाजीनगर मतदारसंघातील कानाकोपऱ्यात ते पदयात्रेच्या माध्यमातून पोहचत आहेत. आज खडकी व्यापारी संघटनेची मनिष आनंद यांच्यासोबत बैठक झाली, या बैठकीत खडकी मधील व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली, व्यापाऱ्यांच्या सर्व समस्या सोडविण्याचे दिले आश्वासन यावेळी आनंद यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्यावर येत आहे, यामुळे उमेदवार प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर देत असल्याचे दिसत आहे. मनिष आनंद यांनी खडकी मधील व्यापाऱ्यांची बैठक घेतली यावेळी व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्याबरोबरच खडकी बाजार मधील वाहतुकीचा प्रश्न आणि अन्य अडचणीवर तोडगा काढण्याचे आश्वासन आनंद यांनी यावेळी दिले.

दरम्यान, आज गुरुनानक जयंतीचा मुहूर्त साधत मनिष आनंद यांनी खडकी आणि रेंज हिल्स येथील गुरुद्वाराला भेट देऊन दर्शन घेतले आणि नागरिकांशी चर्चा केली. तसेच आज शुक्रवार असल्याने खडकीतील जामा मशीद मध्ये जाऊन नमाज अदा केली.

तत्पूर्वी काल सायंकाळी मनिष आनंद यांनी येरवडा येथील एका बुद्ध विहाराला भेट देत,
त्या परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि या परिसरात विद्यार्थ्यांसाठी एक
सुसज्ज लायब्ररी उभारण्यात येईल असे सांगितले. तसेच मालमत्ता कराच्या प्रश्नावर महापालिका प्रशासनाशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”

Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”

You may have missed