DSK Investors News | ‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी जाहीर करा, मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश

court dhandhuka

पुणे: DSK Investors News | बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्याकडे गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांची यादी पुढील दोन महिन्यांत सादर करावी, असा आदेश या प्रकरणातील विशेष न्यायालयाने मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना दिला आहे. या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली आणि न्यायालयात जमा असलेली रक्कम किती आहे हेदेखील उघड करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतर अनेक वर्ष परतावा न मिळाल्याने अनेक ठेवीदारांनी या गुन्ह्यात न्यायालयात जमा असलेली रक्कम समप्रमाणात परत मिळावी, अशी मागणी केली. याबाबतचा अर्ज ठेवीदारांच्या वतीने ऍड. चंद्रकांत बिडकर यांनी न्यायालयात दाखल केला आहे.

त्यावर विशेष न्यायाधीश ए. सी. डागा यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यासंदर्भात न्यायालयाने दोन महिन्यांत यादी सादर करण्याचा आदेश मावळ-मुळशीचे उपविभागीय दंडाधिकारी सुरेंद्र नवले यांना दिला आहे.

न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हंटले आहे की, हे प्रकरण गुंतागुंतीचे आहे.
वस्तुस्थिती लक्षात घेता या दाव्यातील शेकडो प्रलंबित अर्ज निकाली लावणे आवश्यक आहे.
ठेवीदार आणि गुंतवणूकदारांनी तयार केलेल्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर अशा दाव्याच्या सतत्येबद्दल न्यायालयाला कळवावे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”

Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”

You may have missed