Baner Pune Crime News | बाणेर येथे 1 कोटी 62 लाखांचे सोने, चांदीचे पार्सल पोलिसांनी पकडले

Gold

पुणे : Baner Pune Crime News | राजीव गांधी पुलाजवळ उभारण्यात आलेल्या स्थिर पडताळणी कक्षाने आज एका वाहनातून १ कोटी ६२ लाख रुपयांचे सोने चांदी जप्त केले आहेत. या जप्त केलेल्या सोने चांदीची आयकर विभाग व जीएसटी विभागामार्फत पडताळणी करण्यात येत आहे.

शनिवारी पहाटे एम एच ४३ बी के ५८०६ हे वाहन पोलिसांनी थांबविले. वाहनचालक योगेश कुमार परमार याच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्यात ४ लाख १६ हजार ६३२ रुपयांची ४ किलो ४७९ ग्रॅम चांदी आणि १ कोटी ५७ लाख ९६ हजार १२४ रुपयांचे २ किलो ५११ ग्रॅम सोन्याचे पार्सल आढळून आले. पोलिसांनी याची माहिती आयकर विभाग आणि जीएसटी विभागाला याची माहिती दिली असून हे वाहन चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) आणण्यात आले आहे.

आयकर विभाग आणि जीएसटी विभागाकडून त्याची पडताळणी सुरु आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे सोनेचांदी विविध ज्वेलर्स यांनी मागविले आहेत. त्याची कुरिअरमार्फत पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पोहोच करायचे आहेत. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात पुढील कारवाई केली जात आहे. (Baner Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”

Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”

You may have missed