Vadgaon Sheri Assembly Election 2024 | महिला बाईक रॅलीच्या माध्यमातून मतदारसंघातील विविध प्रश्नांवर उठवला आवाज

Bapusaheb Pathare

बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ महिला बाईक रॅलीमध्ये महिलांचा मोठा सहभाग

पुणे : Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘जिजाऊंच्या लेकी आम्ही, जशा तळपती तलवारी, महाराष्ट्राच्या हितासाठी हाती घेतली तुतारी’… या गर्जनेसह वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapu Pathare) यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या महिला बाईक रॅलीमध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. (Vadgaon Sheri Assembly Election 2024)

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला प्रदेश उपाध्यक्षा अश्विनी महांगडे उपस्थित होत्या. वडगावशेरी येथील राजमाता जिजाऊ ऑक्सीजन पार्क येथून जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली. चंदननगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅली संपन्न झाली. यावेळी महिलांचा मोठा उत्साहपूर्ण प्रतिसाद पाहायला मिळाला. मतदारसंघातील महिलांच्या असलेल्या प्रश्नांवर लक्ष वेधून घेण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने, स्वच्छतागृहांचा अभाव, पथदिव्यांचा अभाव असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न, पाणी प्रश्न, सोसायटीपर्यंत विविध माध्यमातून शटल सेवा मिळावी यावर महिलांनी रॅलीच्या माध्यमातून आवाज उठवला.

मतदारसंघात गेल्या १० वर्षांत महिलांच्या सबलीकरणासाठी, सक्षमीकरणासाठी, सुरक्षेसाठी कोणतेही ठोस काम करण्यात आलेले नाही. महिला वर्गाच्या मूलभूत प्रश्नांकडे अक्षरश: दुर्लक्ष केले आहे. येणाऱ्या काळात बचत गट उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी विमानतळावर जागा उपलब्ध करणे, विविध भागात स्वच्छतागृह उभारणे, महिला व मुलींसाठी स्वसंरक्षण शिबिरांचे व विशेष प्रशिक्षण देणे ही महिलांच्या दृष्टीने महत्त्वाची कामे प्राधान्याने हाती घेणार असल्याचे बापूसाहेब पठारे यांनी रॅलीच्या निमित्ताने सांगितले.

अश्विनी महांगडे यांनीही बापूसाहेब पठारे यांना निवडून देण्याचे आवाहन करत राज्यात महाविकास आघाडीचे
सरकार स्थापन होईल, हा विश्वास व्यक्त केला.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”

Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”

You may have missed