Maharashtra Assembly Election 2024 | उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र; म्हणाले – ‘आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा’

uddhav-thackeray-devendra-fadnavis

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. सत्ताधारी विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे (All India Muslim Personal Law Board) प्रमुख सज्जाद नोमानी (Sajjad Nomani) यांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) समर्थन जाहीर केले आहे.

यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. “मुस्लीम मतांच्या लाचारीसाठी वोट जिहाद करण्याचा प्रयत्न होत असून आता आपल्याला मतांचे धर्मयुद्ध लढावं लागेल”, असे फडणवीस यांनी म्हंटले आहे.

फडणवीस म्हणाले, ” महाविकास आघाडीच्या विजयासाठी वोट जिहादचा (Vote Jihad) नारा दिला जातो आहे. या वोट जिहादचे मुख्य सुत्रधार कोण? हे आताच तुम्ही ऐकलं. मतांसाठी महाविकास आघाडीचे नेते मुस्लिमांची तवळे चाटत आहेत. हे लोक सांगतात, की आम्ही दंगेखोरांना सोडून देऊ. या ठिकाणी वोटजिहाद होत असेल, तर मतांचे धर्मयुद्ध आपल्यालाही लढावं लागेल. आता आपण एक राहलो, तरच सेफ राहू”, असे भाष्य फडणवीस यांनी केले.

दरम्यान फडणवीसांच्या या टीकेला उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत बोलताना प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, ” आम्ही आमच्या प्रचार गीतात जय शिवाजी, जय भवानी बोललो, तर यांच्या डोळ्यात खुपते. हिंदू आमचा धर्म आहे, असं बोललो तर तेही त्यांच्या डोळ्यात खुपतं, आणि हे महाशय आता धर्मयुद्ध करायला निघाले आहेत. खरं तर फडणवीसांनी आधी स्वत:चं जॅकेट सांभाळावं, मग धर्मयुद्ध करावं”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

FIR On PMC Officers In Pune | पुणे महापालिका उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकांवर गुन्हा दाखल !
बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार करुन महापालिकेची फसवणूक, आणखी पाच अधिकाऱ्यांच्या डिग्रीविषयी संशय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘शरद पवार, ठाकरेंनी मनोज जरांगेंशी बोलायला सांगितलं’,
ऍड.असिम सरोदेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ” जरांगेंच्या भेटीत विधानसभेला उमेदवार न देण्याबाबत चर्चा…”

Devendra Fadnavis On Sharad Pawar | देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले –
“शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली”

You may have missed