Khadakwasla Assembly Election 2024 | भाजप महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांच्या बाईक रॅलीला धनकवडी गावात अभूतपूर्व प्रतिसाद

पुणे: Khadakwasla Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024) प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. मतदानासाठी आता अवघे काही तास बाकी आहेत. दरम्यान खडकवासला विधानसभा मतदारसंघातील भाजप, महायुतीचे अधिकृत उमेदवार (BJP Mahayuti Candidate) भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir) यांच्या प्रचारार्थ आज (दि.१८) खडकवासला मतदारसंघात विविध भागांतून भव्य बाईक रॅली आणि पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. (Khadakwasla Assembly Election 2024)
या बाईक रॅलीला धनकवडी, बालाजीनगर, भारती विद्यापीठ परिसरातून सुरुवात झाली. त्यानंतर श्री जानुबाई मंदिर, तळजाई पठार, संभाजी नगर, तापकीर स्मृती, चैतन्यनगर, विद्या नगरी, कात्रज डेअरी, वंडर सिटी, नारायणी धाम या मार्गाने रॅली काढण्यात आली. यावेळी तापकीर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
भीमराव तापकीर म्हणाले, ” खडकवासला मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेचा पाठिंबा महत्त्वाचा आहे. या भागाचा विकास आणि प्रगती हेच माझे ध्येय आहे. जनतेच्या विश्वासामुळे विजय निश्चित आहे”, अशी भावना तापकीर यांनी व्यक्त केली.
यावेळी उपमहापौर दत्ता धनकवडे, माजी नगरसेविका वर्षा तापकीर, माजी नगरसेविका अश्विनी भागवत, राणी भोसले, मोहिनी देवकर, आप्पासाहेब धावणे, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष अरुण राजवाडे, संतोष फरांदे, विश्वास आहेर, युवराज रेणूसे, शंकर कडू, अभिषेक तापकीर, सचिन बदक, गणेश पवार, सागर भागवत, सागर साबळे, आनंद शिंदे, दत्ता सावंत, अंकुश सोनवले, महेश भोसले, सत्यवान कामठे, सतिश घाटे, उल्हास खुटवड,दादा देवकर, पांडुरंग भोसले, सामाजिक कार्यकर्ते दिगंबर डवरी, प्रभाग अध्यक्ष अमोल चौधरी, रायबा भोसले, भाजपा सरचिटणीस युवा मोर्चा ओंकार डवरी, जितू कोंढरे, चिन्मय भोसले, राहुल पाखरे, रितेश रासकर, आनंद साळुंखे, अंकुश कोकाटे, मंगेश पवार, तसेच इतर मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई
Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध