Akshay Shinde Encounter | अक्षय शिंदेच्या कथित चकमकीतील मृत्यू प्रकरणात हायकोर्टाने सीआयडीला फटकारलं, तपासात निष्काळजीपणा केल्याची टिप्पणी

Mumbai-High-Court-on-Akshay-Shinde

मुंबई: Akshay Shinde Encounter | बदलापूर शाळेतील (Badlapur School Case) लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित चकमकीतील मृत्यूच्या तपासात निष्काळजीपणा केला जात असल्याची टिप्पणी करत हायकोर्टाने काल (दि.१८) सीआयडीला (Mumbai High Court On CID) खडेबोल सुनावले आहेत.

या प्रकरणातील तपास गांभीर्याने करण्यात येत नसून त्यात अनेक त्रुटी आहेत, असे निरीक्षण न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने नोंदविले. मृत अक्षय शिंदेच्या हातावर बंदुकीच्या गोळ्यांचे अवशेष नसणे, त्याला दिलेल्या पाण्याच्या बाटलीवर त्याच्या बोटांचे ठसे न सापडणे, हे अजब आहे, असे भाष्य कोर्टाने केले.

तसेच शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी चौकशी करत असलेल्या दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे सादर करण्यास विलंब झाल्यानेही कोर्टाने सीआयडीला फटकारले आहे. सत्य शोधण्याचा आणि प्रत्येक पुरावा दंडाधिकाऱ्यांसमोर मांडला जात आहे की नाही? यावर लक्ष ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर तपास योग्य प्रकारे चालू आहे की नाही, हेही आम्हाला पाहायचे आहे. आम्हाला निःष्पक्ष चौकशी हवी आहे, असे कोर्टाने नमूद केले.

तपासातील त्रुटी झाकण्यासाठी आणखी किती युक्तिवाद करणार? असा सवाल कोर्टाने महाधिवक्ता बिरेंद्र सराफ
यांना केला. तपास कोणत्या पद्धतीने चालला आहे, हे पाहण्यासाठी आणि सांगण्यासाठी कोणत्याही
तज्ज्ञाची आवश्यकता नाही, असे म्हणत कोर्टाने सीआयडीला दोन आठवड्यात तपास पूर्ण करण्याचे
आणि सर्व पुरावे दंडाधिकाऱ्यांपुढे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई

Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध

Policeman Suicide News | तणावग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

Maharashtra Assembly Election 2024 | मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास ‘हे’ 12 प्रकारचे पुरावे ग्राह्य; मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी

Indapur Assembly Election 2024 | ‘दत्तात्रय भरणे सारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकतीने काम करा’, जयंत पाटील यांचे इंदापूरमध्ये आवाहन

You may have missed