Sikandar Box Office Collection | सलमान खानच्या ‘सिकंदर’ची दमदार सुरूवात, पहिल्याच दिवशी गाजवलं Box Office

Sikandar

ऑनलाईन टीम | अलीकडेच बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा ‘सिकंदर’ (Sikandar Box Office Collection) हा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘सिकंदर’ चित्रपट हा काल म्हणजे 30 मार्च रोजी प्रदर्शित करण्यात आला असून, 27 मार्च पासून या चित्रपटाचे (Sikandar Box Office Collection) प्री बुकिंग चालू झाले होते.

https://www.instagram.com/p/DHd35XmoceQ/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

‘सिकंदर (Sikandar)’ हा खास ईदसाठी काल प्रदर्शित करण्यात आला. भाईजानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणार असा अंदाज होता. परंतु हवा तेवढा खास हा चित्रपट (Bollywood Movie) नसल्याने प्रेक्षकांनी या चित्रपटाला काहीसा चांगला प्रतिसाद दिला नाही. मात्र सलमानच्या चाहत्यांनी चित्रपटाला चांगलीच पसंती दर्शवली आहे.

दरम्यान, ‘सिकंदर’ ने पहिल्याच दिवशी म्हणजे ईदच्या आदल्या दिवशी म्हणजे 30 मार्च रोजी भारतात तब्बल 29 कोटींची कमाई केली, तर देशभरात जवळपास 40 कोटींची कमाई केली आहे (Sikandar Box Office Collection).

You may have missed