Pune Accident News | भरधाव हायवा डंपरने मोटारसायकलला धडक दिल्याने तरुणीचा मृत्यु; पुणे-सासवड रोडवरील फुरसुंगीमधील घटना

Pune Accident News | Young woman dies after speeding hi-way dumper collides with motorcycle; incident in Fursungi on Pune-Saswad road

पुणे : Pune Accident News | उंड्री येथे कामाला जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव हायवा डंपरने मोटारसायकलला धडक दिल्याने सहप्रवासी तरुणी हिचा मृत्यु झाला आहे. मोटारसायकल चालक तरुण जखमी झाला आहे.

माधुरी सतीश जाधव (वय २३, रा. लक्ष्मी निवास, दत्त मंदिराजवळ, भेकराईनगर, फुरसुंगी) असे  मृत्यु पावलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत अभिजित ज्ञानदेव जाधव (वय ३१, रा. तुळजाभवानीनगर, खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन फुरसुंगी पोलिसांनी हायवा डंपरचालक मनोहर रामदास हाके (वय २९, रा. दत्तवाडी, उरुळी कांचन, मुळ रा. भरतगाव, हाकेवाडी, ता. दौंड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात पुणे सासवड रोडवरील फुरसुंगी येथील भोसले व्हिलेज गेटच्या समोर शनिवारी सकाळी पावणेदहा वाजता घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी जाधव या उंड्री येथील एका कंपनीत कामाला होत्या. त्या कंपनीत जात होत्या. त्यावेळी अभिजित जाधव याच्या मोटारसायकलवर बसून त्या भेकराईनगर येथून मंतरवाडीकडे जात होते. भोसले व्हिलेज गेटच्या समोर पाठीमागून भरधाव येणार्‍या हायवा डंपरने त्यांना जोरात धडक दिली. त्यात त्या खाली पडल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अभिजित जाधव हेही गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर हायवा डंपर तेथे न थांबता पळून गेला. गर्दीच्या वेळी अपघात झाल्याचे समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे व त्यांचे सहकारी घटनास्थळी धावुन गेले. फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक भुषण पोटवडे तपास करीत आहेत.

You may have missed