Ajit Pawar | शांत वारे आणि दृश्यमानता 3000 मीटर असताना विमान उतरविण्यासाठी परवानगी देण्यात आल्यानंतर या परवानगीला विमानातील कर्मचार्‍यांनी प्रतिसाद दिला नसल्याचे हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील Air Traffic Control अधिकार्‍यांच्या जबाबातून घटनाक्रम आला समोर

Ajit Pawar | CID to investigate accidental death of Deputy Chief Minister Ajit Pawar; Accidental death registered at Baramati Police Station

पुणे : Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला. त्यावेळी हवाई वाहतूक नियंत्रण (एअर ट्रॉफिक कंट्रोल) कक्षातील कार्यरत असलेल्या अधिकार्‍यांच्या जबाबातून अपघाताचा घटनाक्रम समोर आला आहे. अपघात झाला़ त्यावेळी बारामती येथील वारे शांत होते आणि दृश्यमानता ३ हजार मीटर इतकी होती. विमान उतरविण्यासाठी दृश्यमानता जितकी आवश्यक असते, तितकी त्यावेळी दृश्यमानता असल्याचे दिसून आल्यानेच वैमानिकाने लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यानंतर त्याचे नियंत्रण सुटून विमान अपघातग्रस्त झाल्याचे दिसून आले आहे.

विमान अपघाताला कारणीभूत ठरलेला घटनाक्रम हवाई वाहतूक मंत्रालयाने जाहीर केला आहे़

बारामती हे एक अनियंत्रित विमानतळ ( Uncontrolled Airfield) असून, तिथल्या हवाई वाहतुकीची माहिती बारामतीमधील उड्डाण प्रशिक्षण संस्थांच्या प्रशिक्षकांकडून किंवा वैमानिकांकडून दिली जाते. हवाई वाहतूक नियंत्रण (ATC – Air Traffic Control) कक्षात कार्यरत असलेल्या व्यक्तीच्या जबाबानुसार अपघाताचा घटनाक्रम खाली नमूद केल्याप्रमाणे आहे:

२८ जानेवारी २०२६ रोजी व्हीआय – एस एस के या विमानाचा बारामती केंद्राशी पहिला संपर्क सकाळी ०८:१८ वाजता झाला. विमानाचा पुढचा संपर्क बारामतीपासून ३० नॉटिकल मैल अंतरावर असताना झाला आणि त्यांना पुणे केंद्राकडून परवानगी देण्यात आली. वैमानिकांना त्यांच्या विवेकानुसार दृश्य हवामान परिस्थितीत (Visual Meteorological Conditions) विमान खाली उतरवण्याचा सल्ला देण्यात आला होता. विमानातील कर्मचार्‍यांनी वारे आणि दृश्यमानतेबाबत (Visibility) चौकशी केली असता, वारे शांत असून दृश्यमानता सुमारे ३००० मीटर असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.

त्यानंतर विमान धावपट्टी क्रमांक ११ च्या फायनल अप्रोचवर असल्याचे कळवले गेले, मात्र त्यांना धावपट्टी दिसत नव्हती. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात त्यांनी गो अराउंड (पुन्हा उड्डाण करून वळण घेणे) करण्याचा निर्णय घेतला.

गो अराउंड केल्यानंतर विमानाला त्याच्या स्थानाबद्दल विचारले असता, कर्मचार्‍यांनी धावपट्टी क्रमांक ११ च्या फायनल अप्रोचवर असल्याचे सांगितले.

त्यांना धावपट्टी दिसताच कळवण्यास सांगण्यात आले. त्यावर, धावपट्टी सध्या दिसत नाही, दिसल्यानंतर कळवू, असे उत्तर त्यांनी दिले. काही सेकंदांनंतर त्यांनी धावपट्टी दिसत असल्याचे कळवले.

भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ०८:४३ वाजता विमानाला धावपट्टी क्रमांक ११ वर उतरण्यासाठी परवानगी (Clearance) देण्यात आली, मात्र विमानातील कर्मचाºयांनी या परवानगीला प्रतिसाद (Readback) दिला नाही.

त्यानंतर भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ०८:४४ वाजता धावपट्टी क्रमांक ११ च्या सुरुवातीच्या भागाजवळ (Threshold) हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला आगीच्या ज्वाळा दिसल्या. तात्काळ आपत्कालीन सेवा घटनास्थळी रवाना झाल्या.

विमानाचे अवशेष धावपट्टी क्रमांक ११ च्या सुरुवातीच्या भागाच्या डाव्या बाजूला सापडले आहेत.

विमान अपघात तपास विभागाने (AAIB – Aircraft Accident Investigation Bureau) या तपासाची सूत्रे हाती घेतली असून, या विभागाचे महासंचालक तपासासाठी अपघातस्थळी पोहचले असून त्यांनी चौकशी सुरु केली आहे.

You may have missed