Pune Crime News | पुणे : धायरीत पिस्तूल घेऊन फिरत होते अन् पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या; 2 गावठी पिस्तुले आणि 4 जिवंत काडतुसे जप्त

Pune Crime News | Pune: Roaming around with a pistol in a bag, and the police caught the two; 2 homemade pistols and 4 live bullets seized

पुणे : Pune Crime News |  नांदेडसिटी पोलिसांनी धायरी परिसरात विनापरवाना अग्निशस्त्रे बाळगल्याच्या आरोपावरून दोन तरुणांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन गावठी बनावटीची लोखंडी पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली.

अनिल प्रकाश लोहबंदे Anil Prakash Lohbande (वय 20, रा. बेनकर वस्ती, धायरी) आणि वैभव महादेव पोळेकर Vaibhav Mahadev Polekar (वय 21, रा. पोकळे वस्ती, धायरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, 16 ऑगस्ट रोजी नांदेडसिटी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते. यावेळी पोलीस अंमलदार भीमराज गांगुर्डे यांना कैलास जीवन फॅक्टरी परिसरात एक संशयित व्यक्ती हत्यार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अनिल लोहबंदे याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून कथितरित्या एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

अधिक चौकशीत आणखी एक गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे त्याने मित्र वैभव पोळेकर याच्याकडे ठेवल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी पोकळे वस्ती परिसरातून वैभवलाही ताब्यात घेत त्याच्याकडून एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 1 लाख 62 हजार रुपये आहे. नांदेडसिटी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

You may have missed