Pune Crime News | हडपसरमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणार्या व्हाईट पर्ल स्पावर पोलिसांचा छापा; 3 तरुणींची सुटका करुन स्पा मॅनेजरला केली अटक
पुणे : Pune Crime News | हडपसर येथे स्पाच्या नावावर वेश्या व्यवसाय करणार्या व्हाईट पर्ल स्पावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पोलिसांनी छापा टाकून स्पा मॅनेजरला अटक करुन ३ तरुणींची सुटका केली आहे.
सौरभ शामराव इंगळे (वय २८, रा. लक्ष्मीमाता मंदिर, काळेपडळ, हडपसर) असे या स्पा मॅनेजरचे नाव आहे.
अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्ष यांना माहिती मिळाली की, हडपसर गाडीतळ येथील दशमेश कॉम्प्लेक्समधील व्हाईट पर्ल स्पा मध्ये मुलींना वेश्या व्यवसायासाठी आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेण्यात येत आहे. बातमीची पडताळणी करुन बनावट ग्राहक पाठविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी व्हाईट पर्ल स्पा येथे छापा टाकून सौरभ इंगळे याला पकडण्यात आले. तेथील ३ तरुणींची सुटका करण्यात आली. हडपसर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस उपनिरीक्षक विशांत चव्हाण, पोलीस अंमलदार तुषार भिवरकर, दत्ताराम जाधव, बबनराव केदार, इम्रान नदाफ, रेश्मा कंक व भुजबळ यांनी केली आहे.
