Pune Crime News | आम्ही इथले भाई आहोत, आमचे कोणी काही वाकडे करु शकत नाही, म्हणणार्‍या गाववाल्यांनी तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून मोटारसायकल जाळली

Pune Crime News | Security guard severely injured after being beaten with a stick for not allowing him to enter the society, incident in Mahamadwadi

पुणे : Pune Crime News | आपली दहशत पसरविण्यासाठी महाविद्यालयीन तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्याला जखमी केले. अन्य दोघांना मारहाण करुन त्यांची मोटारसायकल पेटवून देण्याचा प्रकार मांजरीमध्ये घडला.

याबाबत रोहन राजेंद्र थोरात (वय २०, रा. आंबेडकर चौक, येरवडा) यांनी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शुभम बोईना, तेजस सरक (रा. घुले कॉलनी, मांजरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना घुले कॉलनीतील श्री रेसिडेन्सीसमोर १६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहन थोरात व त्याचा मित्र आदित्य बाळु जाधव (वय २१, रा. अशोक नगर, येरवडा) याच्यासोबत १५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जयेश सतीश कांबळे (वय २०, रा. सिद्धीविनायक कॉम्प्लेक्स, घुले कॉलनी, मांजरी) याच्याकडे आले होते. घुले कॉलनीतील लेन नं. ५ येथे रोडवर बोलत थांबले होते. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते घरी जाण्यासाठी निघाले. जयेश याला घरी सोडण्यासाठी जात असताना श्री रेसिडन्सीजवळ दोघांनी त्यांना आवाज दिला. त्यांनी मोटारसायकल थांबवली. त्या दोघांनी मद्यपान केले होते. आदित्य जाधव व जयेश कांबळे हे त्यांच्याजवळ गेल्यावर दोघांनी हुज्जत घालून शिवीगाळ करु लागले.

त्यावर त्यांना शिवीगाळ का करता, असे  विचारल्यावर त्यांनी आम्ही इथले गाववाले आहोत, असे बोलून धक्काबुक्की करु लागले. त्यातील एकाने हातातील बिअरची बाटली आदित्य जाधव याच्या डोक्यात मारून त्याला जखमी केले. त्यावेळी त्याने तुटलेली बिअरची बाटली घेऊन हवेत फिरवुन ‘‘आम्ही इथले भाई आहोत, आमचे कोणी वाकडे करु शकत नाही, कोण आडवे आले तर त्यांना सोडणार नाही, ’’ असे बोलून दहशत निर्माण केली. त्यांनी तेथे पडलेले सिमेंटचे ब्लॉक उचलून त्याने मारहाण करु लागले. तेव्हा ते तेथून पळून गेले. त्यावेळी त्यांची तेथे लावलेल्या पल्सर मोटारसायकलच्या पेट्रोलचा पाईप काढून गाडीला आग लावली. त्यात गाडी पूर्णपणे जळून नुकसान झाले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना कॉल केला. पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे तपास करीत आहेत.

You may have missed