Pune Crime News | उसने पैसे परत देण्यासाठी शिवीगाळ करुन मारहाण केल्याने एकाने गळफास घेऊन उचलले टोकाचे पाऊल, बिबवेवाडी पोलिसांनी मारहाण करणार्‍यास केली अटक

Pune Crime News | Young woman hangs herself over love affair; Warje police registers case against young man

पुणे : Pune Crime News |  उसने घेतलेले पैसे परत करता न आल्याने घरी येऊन शिवीगाळ करुन मारहाण केल्याने एकाने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपविले. बिबवेवाडी पोलिसांनी मारहाण करणार्‍यास अटक केली आहे.

वसंत जाधव (वय ५३, रा. शिवतेजनगर, बिबवेवाडी) असे जीवन संपविलेल्याचे नाव आहे.

याबाबत त्यांचा मुलगा चंद्रशेखर वसंत जाधव (वय २१, रा. गल्ली क्रमांक ११, शिवतेजनगर, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विनोद शेळके (वय ५९, रा. पदमावती, सहकारनगर) याला अटक केली आहे. त्याची पत्नी सुनिता विनोद शेळके आणि आकाशी विनोद शेळके यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शिवतेज नगर येथील फिर्यादी यांच्या घरी २०२५ पासून १६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत जाधव हे पायाने अधू असल्याने घरीच असायचे. ते खंडोबाची पुजा सांगायचे. विनोद शेळके व इतरांची त्यानिमित्ताने ओळख झाली होती. वसंत जाधव हे पुजा सांगण्यासाठी शेळके यांच्या घरीही जात असत. यातूनच वसंत जाधव यांनी विनोद शेळके याच्याकडून १ लाख रुपये उसने घेतले होते. ते त्यांना परत करणे जमत नव्हते. यावरुन गेल्या वर्षीपासून विनोद शेळके हा जाधव यांना वारंवार फोन करुन धमकावत होता. त्यांच्या घरी येऊन शिवीगाळ करुन मारहाण करुन मानसिक त्रास देत होता. त्याची पत्नी व मुलगी हे त्याला साथ देत होते. एका बाजूला घेतलेले पैसे परत करता येत नाही, दुसरीकडे विनोद शेळके हा मारहाण करुन करत असलेला मानसिक त्रास याला कंटाळून १६ फेब्रुवारी रोजी वसंत जाधव यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपविले. बिबवेवाडी पोलिसांनी विनोद शेळके याला अटक केली असून पोलीस निरीक्षक सुरज बेंद्रे तपास करीत आहेत.

You may have missed