Pune Traffic Police Action | अबब! एकाच दिवसात 348 बुलेटचालकांवर कारवाई, मॉडिफाईड सायलेन्सर जप्त

Pune Traffic Police Action | Abb! Action taken against 348 bullet drivers in a single day, modified silencers seized

पुणे : Pune Traffic Police Action | मॉडिफाईड सायलेन्सर लावून फटाका सारखा आवाज करत बुलेट चालवुन लोकांना त्रास देणार्‍या वाहनचालकाविरुद्ध वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबविली़ एकाच दिवसात ३४८ बुलेटचालक या कारवाईत पोलिसांच्या हाती लागले.

दोन दिवसांपूर्वी दुपारच्या वेळी बुलेटचालक मोठमोठ्याने हॉर्न वाजवित असल्याने ज्येष्ठ नागरिकाने हॉर्न वाजवू नको, असे सांगितल्याने बुलेटचालक व त्याच्या साथीदारांनी ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करुन जखमी केले होते.

मॉडिफाईड सायलेन्सर असलेल्या ३४८ बुलेटचालकांना वाहतूक पोलिसांनी एकाच दिवसात पकडले. या कारवाईदरम्यान त्यांच्याकडून ३ लाख ३४ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. या कारवाईदरम्यान ३४८ मॉडिफाईड सायलेन्सर १४८ वाहने जप्त करण्यात आली आहे.

तसेच मोहिमेदरम्यान इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यात आली. विविध नियमभंग प्रकरणातून १५ लाख ७३ हजार ८०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

दारु पिऊन वाहन चालविणार्‍या ५३ आरोपींचे खटले न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी ४४ आरोपींना न्यायालयाने एकूण ४ लाख २९ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला असून तो दंड तत्काळ वसुल करण्यात आला आहे.