Pune Crime News | काँग्रेस प्रवक्ते हणुमंत पवार यांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे यांनी पिस्तुल दाखवून केली मारहाण, चौघांना अटक

Pune Crime News | Congress spokesperson Hanumant Pawar was beaten up by Hindutva activist Tushar Damgude while pointing a pistol, four arrested

पुणे : Pune Crime News |  टीव्ही चॅनेलवरील डिबेटमध्ये झालेल्या वादावादीचे पडसाद बाहेर उमटले असून हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे व त्यांच्या साथीदारांनी काँग्रेस प्रवक्ते हणुमंत पवार यांना पिस्तुल दाखवून मारहाण केल्याने एकच खळबळ उडाली.

https://www.instagram.com/p/DVIYlCziWqS

याबाबत हणुमंत दिगंबर पवार (वय ४१, रा. जाधवनगर, वडगाव) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तुषार दामगुडे, बाळासाहेब गालफाडे, श्रीनिवास निगडे, ऋषिकेश परदेशी या चौघांना अटक केली आहे. त्यांचे साथीदार, गौरव राठोड, अभिमन्यु मैड यांच्यावर दंगल घडविण्याचा प्रयत्नासह मारहाणीच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मित्र मंडळ चौकातील पुढारी भवन बाहेर २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढारी न्युज चॅनेलच्या डिबेट शो करीता तुषार दामगुडे आणि हणुमंत पवार हे आले होते. या डिबेट शोमध्ये या दोघांमध्ये वादावादी झाली. डिबेट शो संपल्याने ते पुढारी भवनच्या खाली आहे. त्यावेळी दामगुडे यांनी आपल्या साथीदारांना अगोदरच बोलावून ठेवले होते. यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. तुषार दामगुडे याने “तु भाजपा विरोधात का बोलतो, तुला एवढा का पुळका आहे, हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधामध्ये बोलल्यानंतर तुला राग का येतो, माझ्या कमरेला काय आहे बघ, पुण्यात जिवंत रहायचे असेल, पुण्यात फिरायचे असेल तर नीट वागायचे,” असे म्हणून दामगुडे याने कमरेचे पिस्तुल दाखविले. यावर हणुमंत पवार यांनी त्यांना “मी असल्या खेळण्यांना भीक घालत नाही़,’ असे म्हटल्याने दामगुडे आणि त्याच्या साथीदारांनी पवार यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तोंडावर ठोसे मारुन अरवाच्च भाषेमध्ये शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस वरिष्ठ नेते अ‍ॅड. अभय छाजेड, प्रशांत जगताप आणि इतर कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम व त्यांचे अधिकारी घटनास्थळी आले. स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ तपास करीत आहेत.

You may have missed