Pune Crime News | महिला बाऊन्सरचा विनयभंग करणार्या मुकेश धिवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | महापालिका निवडणुकीत अपक्ष निवडणुक लढविलेल्याने आपल्यासाठी नेमलेल्या महिला बाऊन्सरचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी या कार्यकर्त्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
मुकेश मधुकर धिवार (वय ५०, रा. पदमावती, सहकारनगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. ही घटना १९ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली होती.
मुकेश धिवार याने प्रभाग क्रमांक ३६ येथून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढविली होती. त्याने आपल्या सरंक्षणासाठी महिला बाऊन्सरची नेमणूक केली होती. या बाऊन्सर म्हणून काम करणार्या महिलेने त्यांना सिक्युरिटी बॉडीगार्डचे पेमेंट देण्याबाबत विचारले. त्यावेळी त्यान फिर्यादी यांना उद्या पेमेंट देतो, असे सांगितले. त्यानंतर त्याने या महिलेला दहा मिनिटे बाजुला ये, तुझ्यासाठी मी काहीही करेन, मी तुला खूप दिवसांपासून बोलेन म्हणत होतो, पण बोलता आले नाही, म्हणून आज बोललो, असे म्हणून त्यांच्याबरोबर मनास लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले. पोलीस हवालदार जयश्री शेळके तपास करीत आहेत.
