Pune Traffic Police | वाहतूक शाखेचे पीटीपी अ‍ॅप डाऊनलोड केल्याने पावणेचार कोटी दंड झाला वसुल; सर्वाधिक वाहतूक कारवाया नोंदविणार्‍या विजेत्यांना पुरस्कार देऊन गौरव

Pune Traffic Police | Fine of Rs. 4.5 crore recovered by downloading the PTP app of the traffic branch; Winners who registered the most traffic activities were honored with awards

पुणे : Pune Traffic Police | वाहतूक नियमभंग करणार्‍यांवर कारवाईसाठी नागरिकांनी वाहनचालकांविरोधात तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या पीटीपी अ‍ॅपचा वापर करणार्‍यांनी अ‍ॅप वापरण्यापूर्वी स्वत:वर असलेले एकूण ३ कोटी ८३ लाख ३७ हजार ९०० रुपयांचा दंड भरणा केल्याने एरवी वसुल न होणारा हा पेंंडिग असलेला वाहतूक दंड वसुल करण्यात हे अ‍ॅप मदतगार साबित ठरले आहे. या अ‍ॅपचा वापर करुन वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकाविरोधात सर्वाधिक तक्रारी करणार्‍या पहिल्या पाच विजेत्यांना ५० हजार रुपये, २५ हजार रुपये, १५ हजार रुपये, १० हजार रुपये व ५ हजार रुपये व प्रमाणपत्र अशी बक्षिसे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते देण्यात आली. त्याचप्रमाणे पीटीपी अ‍ॅपद्वारे सर्वाधिक प्रभावी कारवाई नोंदविणार्‍या ३ पोलीस अंमलदारांनाही गौरविण्यात आले.

पुणे शहर वाहतूक पोलिसांमार्फत पीटीपी हे अ‍ॅप नागरिकांसाठी जानेवारी महिन्यामध्ये प्रसारित करण्यात आले होते. या अ‍ॅपद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकाविरोधात तक्रारी नोंदविण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पीपीसीआर व पुणे शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी संबंधित वाहनचालकावर कोणताही वाहतूक नियमभंगाचा दंड असता कामा नये, असा एक नियम आहे. त्यामुळे ज्यांना या अ‍ॅपचा वापर करायचा आहे, त्यांनी अगोदर त्यांच्यावर असलेला वाहतूक दंड भरावा लागला. आतापर्यंत ९३ हजार १९० नागरिकांनी या अ‍ॅपचा वापर केला असून त्यांनी स्वत:वर असलेला ३ कोटी ९३ लाख ३७ हजार ९०० रुपयांचा दंड भरणा केला आहे. या ९३ हजार नागरिकांकडून १ लाख ८१ हजार ५५५ केसेस प्राप्त झाल्या आहेत. त्यांची पडताळणी करुन एकूण १ लाख ३२ हजार ४८५ केसेसचे चलन इश्यु करण्यात आले आहे.

ट्रिपल सीट, रॉन्ग साईड वाहन चालविणे, ड्रँक अ‍ॅण्ड ड्राईव्ह, बंदी असतानाही जड वाहनांची वाहतूक करणे याविरोधात शहर पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्यांच्यावर टारगेटेड कारवाई करण्यात येत आहे. चौकात पोलीस नाही, हे पाहून वाहतूक नियमभंग करण्याचे प्रमाण मोठे आहे. या अ‍ॅपमुळे आता वाहतूक पोलीस नसला तरी एक अदृश्य हात रस्त्यांवर वावरत आहे. नागरिकांचा सहभाग कसा वाढविता येईल, जेणे करुन लोकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याची सवय वाढविता येईल, यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावेळी सांगितले. सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी आदि उपस्थित होते.

You may have missed