Kondhwa Pune News | पुणे: कोंढव्यातील इफ्तार पार्टीमध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त्त रंजनकुमार शर्मा सहभागी

Kondhwa Pune News | Pune: Police Commissioner Amitesh Kumar, Joint Commissioner Ranjan Kumar Sharma participate in Iftar party in Kondhwa

पुणे : Kondhwa Pune News | सध्या रमजान महिना सुरु असून शहरात मुस्लिम समाज मोठ्या उत्साहाने रोज वेगवेगळ्या ठिकाणी इफर पार्टी आयोजित करीत आहे .कोंढवा येथे काल इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती. या इफ्तार पार्टीत पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. या इफ्तार पार्टीत पुणे शहरातील सर्व जाती धर्मातील नागरिक व प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://www.instagram.com/p/DVI-AOKCcrz

या इफ्तार पार्टीत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस उपायुक्त वाहतूक हिम्मत जाधव, कोंढवा पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, गुन्हे पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप,आबिद सय्यद, हाजी बासित शेख तसेच पुणे शहरातील विविध पक्ष संघटनाचे प्रमुख नेते ,कार्यकर्ते. मुस्लिम समाज तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते. या इफ्तार पार्टीचे आयोजन कोंढवा पोलीस स्टेशन व मरकजी बैतूल माल फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले होते .

You may have missed