Baramati By-Election | बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला; सुनेत्रा पवार यांचे नाव निश्चित

Sunetra Pawar

बारामती :  Baramati By-Election | बारामती विधानसभा मतदारसंघात रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आपला उमेदवार निश्चित केला आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या समितीच्या बैठकीत एकमताने घेतला गेला असून, निवडणुकीची अधिकृत घोषणा लवकर होण्याची शक्यता आहे.

बारामती मतदानासाठी अंतिम मतदार यादी १० मार्चला जाहीर होणार आहे, आणि नंतर पोटनिवडणुकीची तारीख निश्चित होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्देश या भागात पुन्हा पक्षाचा दबदबा कायम ठेवणे असा आहे. सुनेत्रा पवार या विधानसभेची सदस्य नसतानाही उपमुख्यमंत्री पदावर आहेत, त्यामुळे पोटनिवडणूक जिंकून त्यांना विधानसभेचे सदस्य होणे आवश्यक आहे.