Hajj Yatra 2026 | हज यात्रेकरुंचे लसीकरण करणार्या महापालिकेच्या अधिकार्यांचा खिदमत हज कमेटीच्या वतीने गौरव
पुणे : ( हाजी बासित शेख ) – Hajj Yatra 2026 | पुणे शहर व जिल्ह्यातून हज यात्रेला जाणार्या सुमारे १५०० यात्रेकरुंचे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने खिदमत हज कमेटीच्या वतीने महापालिकेच्या सोनावणे हॉस्पिटलमध्ये लसीकरण करण्यात आले. तसेच कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये विशेष शिबीरामध्ये या सर्व यात्रेकरुंची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. या आरोग्य तपासणी व लसीकरणासाठी सहकार्य करणार्या महापालिका अधिकार्यांचा खिदमत हज कमेटीच्या वतीने गौरव करण्यात आला.

महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांचा खिदमत हज कमेटीचे चेअरमन हाजी बासीत शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कमेटीचे सदस्य नविद शेख, युसुफ परीहार , खालिद अत्तर आदि उपस्थित होते.

आरोग्य शिबीर आणि लसीकरण मोहिमेसाठी सहकार्य करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. निना बोराडे, सहायक आरोग्य अधिकारी राजेश दिघे, लसीकरण वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद मखर, डॉ. अब्दुल सलाम सुतार, संदेश देशपांडे, लसीकरण विभाग प्रमुख परिचारिका शुंभागी वाघापुरे, संगिता शेंडकर, अनुराधा हगवणे, एकनाथ सोनासे यांचा सत्कार करण्यात आला.
कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये सुमारे १५०० यात्रेकरुंची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करुन देणारे कमला नेहरु हॉस्पिटलचे सुपरिटेंड प्रशांत बोटे, डॉ. सुशील पुंडघे यांचा सत्कार खिदमत हज कमिटीच्या वतीने करण्यात आला.
महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम व अन्य अधिकार्यांनी त्यांच्या सहकार्यामुळे हज यात्रेकरुंची एकाच छत्राखाली सर्व आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध झाल्याने महत्वाची अत्यावश्यक बाब पूर्ण करणे शक्य झाले आहे.
