Pune Crime News | मैत्रिणीशी का बोलतो, असे म्हणून मित्रांनी तरुणाच्या डोक्यात, हातावर कोयत्याने वार करुन केले गंभीर जखमी, कोथरुड येथील पौड फाट्यावरील घटना
पुणे : Pune Crime News | माझ्या मैत्रिणीशी का बोलतो, असे म्हणून टोळक्याने एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन डोक्यात, हातावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत चिन्मय चंद्रकांत भोसले (वय २१, रा. विश्वशांती चौक, केळेवाडी, पौड रोड) यांनी कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी अमित कांबळे (वय २३, रा. साईबाबा मंदिराजवळ, गोखलेनगर), अंकुश पवार (वय १९, रा. अचानक मित्रमंडळाजवळ, बारामती होस्टलसमोर, गोखलेनगर), अनुष्का पवार (वय १९, रा. ओम आंगण सोसायटी, गणेशनगर, नवी सांगवी), रिक्षीका वेलाग लेटी (वय १८, रा. बालाजी चौक, सुस गाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पौड फाटा येथील मेगासिटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर २४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ वाजता घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वाकडेवाडी येथे नोकरी करतात. ते १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पत्रकारनगर येथे गेले होते. त्यावेळी अंकुश पवार याने त्याच्या मैत्रिणीबरोबर का बोलतोस, असे कारण पुढे करुन चिन्मय भोसले याच्याशी वाद घातला. तो मित्र असल्यामुळे त्यावेळी त्यांनी तक्रार केली नाही. त्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ वाजता सम्यक संदीप गाडेकर (वय १८, रा. गोखलेनगर) याच्या सोबत मेगासिटीकडे जाणार्या रोडवर बोलत थांबले होते. त्यावेळी अचानक ३ गाड्यांवरुन त्यांच्या ओळखीचे अमित कांबळे, अंकुश पवार, अनुष्का पवार, रिक्षीका वेलागलेटी हे आले. अमित कांबळे याने चिन्मय भोसले याच्या गळ्यात हात टाकून म्हणाला की जरा साईडला ये तुझ्याशी बोलायचे आहे.
पण, चिन्मय न गेल्याचा राग येऊन अमित कांबळे हा शिवीगाळ करु लागला. त्यानंतर त्याच्याबरोबरच्यांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. अंकुश पवार याने त्याच्याकडील लोखंडी हत्यार घेऊन त्याच्या अंगावर धावून आला. चिन्मय याने स्वत:ला वाचविण्यासाठी उजवा हात पुढे केला. तेव्हा हाताच्या बोटावर वार बसला. तो खाली वाकल्यावर दुसरा वार त्याच्या डोक्यात घातला त्याला वाचविण्यासाठी सम्यक गाडेकर हा पुढे आल्यावर इतर चौघांनी त्यालाही हाताने मारहाण केली. चिन्मय याच्या डोक्यातून, हातातील रक्त येत असल्याचे पाहून त चौघेही निघून गेले. चिन्मय भोसले याने ससून रुग्णालयात उपचार केल्यानंतर फिर्याद दिली. पोलीस हवालदार शिंदे तपास करीत आहे.
