Pune Crime News । महाविद्यालयीन युवतींना इशारे करुन विनयभंग करणार्या रिक्षाचालकाला चतु:श्रृंगी पोलिसांनी केली अटक
पुणे : Pune Crime News । महाविद्यालयात जाणार्या युवतींना हाताने इशारे करुन वाईट नजरेने पाहून त्यांचा पाठलाग करत हिंजवडीपर्यंत गेलेल्या रिक्षाचालकाला चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे.
ऋषिकेश हनुमंत मुळीक Rishikesh Hanumant Mulik (वय २६, रा. कस्पटे वस्ती, वाकड) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन ते सायंकाळ ५ वाजेच्या दरम्यान औंध ते हिंजवडी दरम्यान घडली.
याबाबत एका अल्पवयीन मुलीने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी व तिची मैत्रिण या कनिष्ठ महाविद्यालयात शिकतात. त्या २४ फेब्रुवारी रोजी औंध येथून घरी जात होत्या. त्यावेळी ऋषिकेश मुळीक याने त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहून हाताने इशारे केले. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतरही तो पाठलाग करत हिंजवडीपर्यंत आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे विनयभंगाची तक्रार केली. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करीत आहेत.
