Pune Crime News । अल्पवयीन मुलाकडून दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने मोटारसायकल केली जप्त

Pune Crime News | Anti-Robbery and Anti-Vehicle Theft Squad seizes motorcycle from minor

पुणे : Pune Crime News । दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने किष्किंदानगर येथे थांबलेल्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडील चोरीची मोटारसायकल जप्त केली आहे.

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाकडील पोलीस अंमलदार गस्त घालत होते. त्यादरम्यान पोलीस अंमलदार रविंद्र लोखंडे व साईकुमार कारके यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक जण यामाहा कंपनीची मोटारसायकल घेऊन किष्किंदानगर येथील धुमाळ चौकात उभा आहे. ही मोटारसायकल चोरी असल्याचा संशय आहे. या बातमीवरुन पोलिसांनी तेथे जाऊन एकाला ताब्यात घेतले. तो अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. त्याच्याकडील मोटारसायकल ही चोरीचे असल्याने निष्पन्न झाले. मोटारसायकल चोरीचा गुन्हा डेक्कन पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला होता. पोलिसांनी १ लाख ६० हजार रुपयांची मोटारसायकल जप्त करुन पुढील तपासाकामी डेक्कन पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके, पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बाळु गायकवाड, रवींद्र लोखंडे, प्रदिप राठोड, धनंजय ताजणे, साईकुमार कारके, नारायण बनकर, साधना पवार यांनी केली आहे. 

You may have missed