Pune Crime News | दारुच्या नशेत धार्मिक स्थळाच्या भिंतीवर बिअरच्या बाटल्या टाकणार्‍या 5 जणांना फरासखाना पोलिसांनी केली अटक

arrest (1)

पुणे : Pune Crime News | धुळवड साजरी केल्यानंतर दारुवाला पुलाजवळील नागझरीच्या भिंतीलगत दारु पित बसलेल्याने रिकाम्या बिअरच्या बाटल्या धार्मिक स्थळाच्या भिंतीवर फेकल्या. फरासखाना पोलिसांनी तातडीने या ५ जणांना पकडून त्यांना अटक केली आहे.

रोनित विशाल पवार Ronit Vishal Pawar (रा. राजेवाडी, नाना पेठ), साहिल अस्मित भोरडे  Sahil Asmit Bhorade (रा. दारुवाला पुल, रास्ता पेठ), तेजस शशिकांत जाधव Tejas Shashikant Jadhav (रा. आशिर्वाद सोसायटी, बारणे रोड, मंगळवार पेठ), यश प्रकाश फुलावरे  Yash Prakash Phulavare(रा. स्वामी समर्थ अपार्टमेंट, सोमवार पेठ), अक्की ऊर्फ अक्षय सुनिल दोरगे Akki alias Akshay Sunil Dorge (रा. एम्पायर बिल्डिंग, दांगट इस्टेट, वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत दारुवाला मस्जिदचे ट्रस्टी अब्दुल अजीज अब्दुला शेख (वय ६७, रा. रास्ता पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना दारुवाला पुल मस्जिद येथे मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दारुवाला पुल मस्जिदचे उपाध्यक्ष व ट्रस्टी आहेत. रमजान महिन्यातील उपवास सुरु असल्याने ते दुसरे खजीनदार ट्रस्टी इरफान बागवान तसेच शहानवाज सय्यद, फुरकान शेख, राहील शेख इतर ४ ते ५ जण मस्जिदतर्फे सर्वांना शरबत वाटप करण्याकरीता सर्व जण वजूहखानापाशी शरबत तयार करीत होते. त्यावेळी अचानकपणे पूर्वेस असलेल्या नागझरीच्या दिशेकडून काही बाटल्या मस्जिदच्या भिंतीला धडकून खाली पडल्या. त्यामुळे ते सर्व जण बाजुला झाले.

फुटलेल्या बाटल्यांच्या तुकड्याची पाहणी केल्यावर त्या बिअरच्या बाटल्या असल्याचे दिसून आले. त्यामुळे ते सर्व जण मस्जिदच्या बाहेर आले. बंदोबस्ताला असलेल्या पोलीस अंमलदार बोरडे यांना घडलेला प्रकार सांगितला. सर्व जण नागझरीच्या दिशेने जाऊन पाहणी केल्यावर तेथील जीवनधारा विद्यालयाच्या इमारतीच्या मोकळ्या जागेत ३ ते ४ जण दारु पित बसलेले दिसले. त्यांना पाहताच ते पळून जाऊ लागले. पोलीस व इतरांनी त्यांच्यातील एकाला पकडले. रोनीत पवार असे त्याने आपले नाव सांगितले. आम्ही सर्व जण त्या ठिकाणी बिअर व दारु पित बसल्याचे व त्यानंतर रिकाम्या झालेल्या बिअरच्या बाटल्या मस्जिदच्या दिशेने फेकल्याचे सांगितले.

ही घटना समजताच पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, जयंत राजुरकर, पोलीस निरीक्षक मोरे, नामवाडे आदिंनी तातडीने घटनास्थळी भेट घेतली. पोलिसांनी सर्व ५ जणांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक शिवराज हाळे तपास करीत आहेत. 

You may have missed