Neelam Gorhe | राज्यसभा उमेदवारांनी घेतली उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट; डॉ. गोऱ्हे यांच्याकडून उमेदवारांना शुभेच्छा

Neelam Gorhe | Rajya Sabha candidates meet Deputy Chairman Dr. Neelam Gorhe; Dr. Gorhe wishes the candidates

मुंबई : Neelam Gorhe | राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाकडून प्रा. ज्योती वाघमारे यांना तर भारतीय जनता पक्षाकडून विनोद तावडे, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या उमेदवारांनी आज विधानभवन येथे अर्ज दाखल केले. यादरम्यान विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानभवनातील त्यांच्या दालनात शाल व पुष्पगुच्छ देऊन उमेदवारांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ. गोऱ्हे यांनी उमेदवारांना शुभेच्छा देताना त्यांच्या राजकीय कारकीर्दीचे कौतुक केले आणि राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना चांगले काम करतील, असा विश्वास व्यक्त केला.

You may have missed