Pune Pimpri Crime News | शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर जादा नफ्याचे आमिष दाखवून 11 कोटींची फसवणूक करणार्‍या 7 जणांना राजस्थान, महाराष्ट्रातून केली अटक, 1 कोटी 80 लाखांची रक्कम गोठवली

Pune Pimpri Crime News | 7 people arrested from Rajasthan, Maharashtra for defrauding Rs 11 crore by promising high profits on stock market investments, Rs 1.80 crore frozen

पिंपरी /पुणे : Pune Pimpri Crime News | शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर जादा नफ्याचे आमिष दाखवून ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक करणार्‍या ७ जणांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलिसांनी राजस्थान व महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून अटक केली.

अभय बाबासाहेब पाटील Abhay Babasaheb Patil (वय ३४, रा. कोल्हापूर), शिवतेज राजेंद्र पोटे Shivtej Rajendra Pote (वय ३०, रा. वाघोली), महेश करबसपा उडवणे Mahesh Karbasappa Udvane (वय २८, रा. दहिसर ईस्ट, मुंबई), राहुल बहादूरप्रसाद मौर्य Rahul Bahadur Prasad Maurya (वय २४, रा. दहिसर पूर्व, मुंबई), युवराज ऊर्फ संतोष सतीश मुदलीयार Yuvraj alias Santosh Satish Mudaliar (वय ३५, रा. लोहगाव), पंकज मंगु गिरीगोस्वामी Pankaj Mangu Girigoswami (वय २४, रा. राजस्थान), प्रल्हाद पृथ्वीराज गाडरी Prahlad Prithviraj Gadri (वय २३, रा. राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

निगडी प्राधिकरणात राहणारे फिर्यादी ६१ वर्षाचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. ते भोसरी एमआयडीसीमधील कंपनीतून संचालक पदावरुन निवृत्त झाले होते. सेबीमध्ये रजिस्टर असलेल्या कंपनीच्या नावाने सायबर चोरट्यांनी बनावट ईमेलवरुन संपर्क साधून व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमध्ये फिर्यादींना समाविष्ट करुन घेतले. त्यांना वेगवेगळ्या शेअरमध्ये गुंतवणुक करायला सांगितले. त्यांनी ४ नोव्हेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान ५२ व्यवहार करुन ११ कोटी १३ लाख रुपये गुंतवले. त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले.

या गुन्ह्यात आरोपींनी अ‍ॅक्सिस बँक खात्यात २१ लाख रुपये घेतले होते. हे बँक खाते गंगासाई टेक्सटाईल नावाने कोल्हापूर येथील असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील व पथक हे कोल्हापूरला जाऊन तपास केला. त्यात अभय पाटील याने हे अ‍ॅक्सिस बँक खाते शिवतेज पोटे याला वापरण्यास देऊन त्या बदल्यात त्याच्याकडून पैसे घेतले असल्याचे निष्पन्न झाले. अभय पाटील याला अटक करुन शिवतेज पोटे याचा शोध घेतला असता तो वाघोली येथे असल्याची माहिती मिळाली.

शिवतेज पोटे याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्यात वापरण्यात आलेले बँक अकाऊंट व इतर अंदाजे १५ ते २० बँक अकाऊंट सायबर गुन्ह्याकरीता त्याचे साथीदारासह वापरले असल्याची कबुली दिली. त्याचा साथीदार युवराज मुदलीयार, रॉनी व प्रल्हाद (रा. राजस्थान) यांच्यासोबत हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक रवीकिरण नाळे यांनी २ तपास पथके तयार केली. एक पथक मुदलीयार याचा शोध घेण्याकरीता तर दुसरे पथक राजस्थानला रवाना झाले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे युवराज मुदलीयार (रा. लोहगाव), रॉनी (पंकज गिरीगोस्वामी) व प्रल्हाद गाडरी यांना राजस्थानमधून अटक केली.

दरम्यान, या गुन्ह्यातील कोटक बँक खात्यात २५ लाख रुपये घेतले होते. हे बँक खाते एआरएस इंटरप्रायजेस या नावाने महेश उडचणे याचे असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकांडे व पथकाने महेश उडचणे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने त्याचा साथीदार राहुल मौर्य याच्याकडे देऊन त्या बदल्यात त्याच्याकडून कमिशन घेतले असल्याची कबुली दिली. पोलिसांनी राहुल मौर्य याला ताब्यात घेऊन अटक केली.

या आरोपींपैकी अभय पाटील, शिवतेज पोटे, युवराज मुदलीयार यांची कंपनी आहे. त्याद्वारे ते बँक खाते उघडून त्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी सायबर चोरट्यांकडून येणारे पैसे स्वीकारण्यासाठी या बँक खात्यांचा वापर करतात. महेश उडचणे व राहुल मौर्य हे बेरोजगार असून राजस्थानमधील पंकज गिरीगोस्वामी, प्रल्हाद गाडरी हे आचारी आहेत. या सर्वांच्या बँक खात्यातील १ कोटी ८० लाख रुपयांची रक्कम गोठविण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, सागर पोमण, रोहीत डोळस, प्रकाश कातकाडे, पोलीस अंमलदार दीपक भोसले, विनायक म्हसकर, हेमंत खरात, सुभाष पाटील, सुरज शिंदे, किरण देवकर, श्रीकांत कबुले, सौरभ घाटे, प्रविण शेळंकदे, अतुल लोखंडे, सोपान बोधवड, माधव आरोटे, नितेश बिचेवार, दीपक माने, दीपाली चव्हाण, स्वप्निल खणसे यांनी केली आहे़ सरकारी अभियोक्ता सुरज मोहिते यांनी न्यायालयात बाजु मांडून आरोपीची पोलीस कोठडी मिळवुन देण्यास मदत केली आहे.

You may have missed