Raghavendra Bappu Mankar | धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी राघवेंद्र बाप्पु मानकर यांची निवड
धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान ची कार्यकारणी जाहीर
Raghavendra Bappu Mankar | पुण्यातील धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान ची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली. या कार्यकारणीमध्ये पुण्यातील जवळपास सर्वच भागातून नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे.
‘नवी पिढी स्वतःहून आता संभाजी महाराजांचे विचार जगण्याचे, त्यांच्या मार्गावर चालण्याचे प्रयत्न करीत असून छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य, विचार आणि जाज्वल्य इतिहास घराघरात पोहचविण्याचे काम सर्वांनी करावे’ असे आवाहन मुख्य विश्वस्त सुरेश नाशिककर यांनी केले.
‘सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन सांघिक भावनेनं धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान मार्फत संभाजी महाराजांचे कार्य, इतिहास आणि विचार संपूर्ण पुणे शहरात पोहचवीत अनेक सामाजिक उपक्रम येणाऱ्या काळात राबवू’ असा विश्वास नूतन अध्यक्ष नगरसेवक राघवेंद्र मानकर यांनी दिला.
धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान – नवनियुक्त कार्यकारिणी:
अध्यक्ष: राघवेंद्र (बाप्पू) मानकर
महिला आघाडी: स्नेहलताई पाटोळे, अपर्णाताई कुऱ्हाडे, मनीषाताई कांबळे.
कार्याध्यक्ष: नगरसेवक अपूर्व खाडे
मुख्य विश्वस्त: माजी उपमहापौर सुरेशनाना नाशिककर
समन्वयक: संतोष रासकर
उपाध्यक्ष: राजाभाऊ मदगे, प्रकाश कुडले, महेश भरगुडे, हेमंत कांचन, रमेश परदेशी.
खजिनदार: मंदार बलकवडे.
सहखजिनदार: सुनील कुंजीर.
सचिव: कालिदास नाशिककर.
सहसचिव: प्रांजल काळे, अनिकेत मेणे, विश्वास मणेरे, नितीन आपटे, नरेंद्र पायगुडे, प्रवीण डोंगरे.
प्रसिद्धी प्रमुख: रोहित पांडे, चिंतन शाह, आकाश कामठे, अजय खाडे, नवनाथ पठारे, समीर कोंडे, भूषण वरपे, श्रद्धाताई शिंदे, गणेश खेंगरे, अभिषेक अंत्रे.
