Pune PMC News | इस्रायल – इराण युद्धाचे परिणाम;  गॅस बचतीसाठी शहरातील स्मशानभूमीतील गॅस दाहिन्या बंद ठेवण्याचा महापालिकेचा निर्णय

Pune PMC News

पुणे – Pune PMC News | इस्रायल आणि इराण युद्धाचे सावट भारतीयांवर पडू लागले आहेत.  आखाती देशातून आयात होणाऱ्या नैसर्गिक इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याने याचा थेट फटका किचन पासून अंत्यसंस्कारावर देखील झाला आहे. स्वयंपाकाचा गॅस महागला असतानाच आता महापालिकेने केंद्राच्या आदेशानुसार शहरातील स्मशानभूमीतील गॅस दाहिन्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

https://www.instagram.com/p/DVn_nJJCWoF

भारत सरकारच्या अधिपत्याखालील पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय यांनी दिनांक ०५ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार देशभरात उपलब्ध असलेल्या प्रोपेन व ब्यूटेन या घटकांचा वापर प्रामुख्याने घरगुती एलपीजी पुरवठ्यासाठी प्राधान्याने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने गॅस उपलब्धतेमध्ये तुटवडा निर्माण झाल्यामुळे दिनांक ०५ मार्च २०२६ पासून पुढील आदेश येईपर्यंत पुणे शहरातील महानगरपालिकेच्या गॅस आधारित दाहिन्या तात्पुरत्या बंद ठेवण्यात येणार आहेत.

नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी विद्युत दाहिनी व  प्रणालीवर आधारित दाहिन्या सुरू ठेवण्यात येणार आहेत.

तसेच वैकुंठ स्मशानभूमी येथे कार्यरत असलेल्या तीन गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद राहतील. त्याऐवजी नागरिकांच्या सोयीसाठी तेथील पाच विद्युत दाहिन्या कार्यरत ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागामार्फत देण्यात येत आहे.

नागरिकांनी याची नोंद घेऊन महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

You may have missed