Pune Crime News | लघुशंका करु नको सांगितल्यावरुन झालेल्या वादात सराईत गुन्हेगाराने तडीपार गुंडाच्या डोक्यात बॅटने जीवे मारण्याचा केला प्रयत्न, तडीपार गुंड 2 दिवसांपासून बेशुद्ध

Pune Crime News | Security guard injures auto-rickshaw driver by hitting him on the head with

पुणे : Pune Crime News |  तरुण मुले गप्पा मारत असताना भंगार विक्रेता तेथे लघुशंका करण्यासाठी आला. तेव्हा त्याला येथे लघुशंका करु नको, असे सांगूनही न ऐकल्याने तडीपार गुंडाने त्याच्या कानाखाली मारली. आपल्या भाडेकरुच्या कानाखाली मारल्याचे समजल्यावर सराईत गुन्हेगाराने तडीपार गुंडाच्या डोक्यात लाकडी बॅटने  ७ ते ८ घाव घातले. त्यामुळे तडीपार गुंड बेशुद्ध पडला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

आदित्य उद्धव पांचाळ (वय २०, रा. राहुलनगर, कदम वस्ती, शिवणे) असे जखमी झालेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. आदित्य पांचाळ याच्यावरही अनेक गुन्हे दाखल असून त्याला पुण्यातून तडीपार केले आहे. असे असताना तो पुणे शहरात आला होता. त्याच्यावर माई मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे. त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अद्याप तो शुद्धीवर आलेला नाही.

गणेश शिंदे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्यासह एकूण १२ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी दिली.

गणेश शिंदे (वय ३०, रा. पृथ्वीराज अपार्टमेंट, एनडीएरोड, शिवणे) आणि राम अवतार यादव (वय ३६, रा. शितोळे वस्ती, नांदेडगाव, मुळ रा. इटवा, सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) यांच्यावर उत्तमनगर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. ही घटना शिवणे येथील राहुलनगरमधील मालवणी हॉटेलसमोर ६ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली होती.

याबाबत रोहित देवनारायण वर्मा (वय २०, रा. प्राईम रेसिडेन्सी, उत्तमनगर) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहित वर्मा हा सूर्यदत्त इन्स्टिट्युटमध्ये वाणिज्य शाखेत पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. आदित्य पांचाळ हा त्याचा लहानपणापासूनचा मित्र आहे. ६ मार्च रोजी आदित्य पांचाळ याने अनुष्का स्क्रॅप दुकानाच्या पाठीमागे भेटण्याकरीता बोलविले होते. दुपारी ३ वाजता आदित्य पांचाळ, अमित भारती व रोहित वर्मा हे तिघे बोलत बसले होते. त्यावरुन सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अनुष्का स्क्रॅप दुकानातील भाडेकरु  रामअवतार यादव हा पाठीमागे लघवी करण्याकरीता आला होता. त्यावेळी आदित्य पांचाळ याने यादव याला आम्ही गप्पा मारत बसलो असून तु येथे लघवी करु नकोस, असे बोलला.

रामअवतार यादव याने ऐकले नाही. त्यामुळे आदित्य पांचाळ याने त्याच्या कानाखाली मारली. त्यानंतर ते मालवणी हॉटेल जवळ आले. रामअवतार यादव याच्या सांगण्यावरुन गणेश शिंदे हा लाकडी बॅट घेऊन आला. त्याने आदित्य पांचाळ यास ‘‘तू माझा भाडेकरु रामअवतार यादव याला कानाखाली का मारली,’’ असे बोलून शिंदे याने त्याच्याकडील लाकडी बॅट आदित्य पांचाळ याच्या डोक्यात जोरात मारली. त्यावेळी आदित्य हा खाली पडला. आदित्य खाली पडला असतानाही गणेश शिंदे याने त्याच्या डोक्यात ७ ते ८ वेळा डोक्यात बॅट मारली. आदित्य याच्या डोक्यातून रक्त येऊ लागल्याचे बघुन गणेश शिंदे पळून गेला. त्यानंतर रोहित व त्याच्या मित्रांनी आदित्य याला माई मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तो अजूनही बेशुद्ध असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

You may have missed