Pune Crime News | चोरलेल्या स्पोर्ट बाईकच्या मालकाच्या मदतीने वाहतूक दंडाच्या चलनावरुन पर्वती पोलिसांनी मोबाईल हिसकावणार्या परप्रांतीय टोळीचा केला पर्दाफाश, चौघांना पकडून 8 मोबाईल केले जप्त
पुणे : Pune Crime News | स्पोर्ट बाईकवरुन येऊन मोबाईल हिसकावुन नेणार्या परप्रांतीय टोळीचा पर्वती पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चोरीला गेलेल्या बाईक मालकाच्या मदतीने पुणे वाहतूक पोलिसांनी केलेल्या चलनावरुन पोलिसांनी चोरट्यांना ताब्यात घेतले.
अर्जुन कमलेश सरोज Arjun Kamlesh Saroj (वय १८, रा. त्रिमुर्ती चौक, आंबेगाव पठार), इम्रान शफीक शेख Imran Shafiq Shaikh (वय १८, रा. रॉयल जीमजवळ, उंड्री चौक व कोपरीगाव, नवी मुंबई), रवीकुमार राजेंद्र कुमार Ravikumar Rajendra Kumar (वय २१, रा. उंड्री चौक), प्रदिप कुमार महेंद्र कुमार Pradeep Kumar Mahendra Kumar (वय २१, रा. त्रिमुर्ती चौक, आंबेगाव पठार सर्व मुळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
राजु रामसजीवन शर्मा (वय ४५, रा. तावरे कॉलनी, सहकारनगर) हे ५ मार्च रोजी रात्री साडेबारा वाजता सलुनचे काम संपवुन पायी घरी जात असताना मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी त्यांच्या हातातील मोबाईल फोन चोरुन नेला होता. चोरट्यांनी स्पोर्ट बाईक वापरलेली दिसून येत होती. अशा प्रकारे २ घटना पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या होत्या. पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे यांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेतला असता ही यमाहा आर १५ बाईक नवी मुंबई येथुन चोरीला गेली होती. पोलिसांनी बाईकच्या मुळ मालकाशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी ही बाईक पुण्यात चोरटे वापरत असून त्यांना वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियमभंगाची चलने आली असल्याचे सांगितले. मालकांनी दिलेली माहिती व वाहतूक पोलिसांची चलने याच्या माहितीवरून पोलिसांनी चोरट्यांना पाठलाग करुन त्यांना पकडले. त्यांच्याकडून ८ मोबाईल व चोरीची मोटार सायकल जप्त केली आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या सुचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, सूर्या जाधव, मनोज बनसोड, नाना सोखाडे, सद्दाम शेख, अमित चिव्हे, अमोल दुबडे, राकेश सुर्वे यांनी केली आहे.
