Pune Crime News | मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणार्‍या स्पावर छापा घालून 4 तरुणींची सुटका, नागालँडच्या महिला स्पा मॅनेजरला अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असल्याच्या माहिती वरुन अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाने एन आय बी एम येथील ओपल स्पा अँड सलुन येथे छापा घालून ४ तरुणींची सुटका केली. येथील स्पा मॅनेजर असलेल्या नागालँडच्या महिलेला अटक केली आहे.
टी झुंचुमबीनी थम्फीयोलोथा खितान (वय ३२, रा. फ्रेकींज बिल्डिंग, शिवनेरीनगर, कोंढवा) असे अटक केलेल्या स्पा मॅनेजरचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार वैशाली खेडेकर यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन ओपल स्पा अ‍ँड सलुन या एन आय बी एम येथील सनश्री वुडस बिल्डिंगमधील स्पामध्ये मसाजच्या नावाखाली महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे समजले.

पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली बातमीची पडताळणी करुन बनावट ग्राहक पाठवले. ग्राहकाच्या इशार्‍यानंतर पोलिसांनी ओपल स्पावर छापा टाकला. तेथे आणलेल्या ४ पिडित तरुणींची सुटका केली. स्पा मॅनेजर टी खितान हिला अटक करण्यात आली आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक विशाल चव्हाण, पोलीस हवालदार वैशाली खेडेकर, पोलीस अंमलदार दत्ताराम जाधव, बबनराव केदार, भुजबळ, अविनाश कोंडे यांनी केली आहे.

You may have missed