Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार करुन फरार झालेल्या 5 गुन्हेगारांच्या मार्केटयार्ड पोलिस, खंडणी विरोधी पथकाने आवळल्या मुसक्या, विदेशी बनावटीचे पिस्तुल, जिवंत काडतुसे जप्त

Pune Crime News | 5 criminals who fled after shooting a youth due to past enmity arrested by Market Yard, Anti-Extortion Squad, foreign-made pistol, live cartridges seized

पुणे : Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळीबार करुन फरार झालेल्या ५ गुन्हेगारांना खंडणी विरोधी पथक, मार्केटयार्ड पोलिसांनी जेरबंद करुन त्यांच्याकडून विदेशी बनावटीचे पिस्तुल, जिवंत काडतुसे, मोटारसायकल जप्त केली आहे.

बालाजी उमाप (वय २२), साहिल चव्हाण (वय २०, दोघे रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी), राजू उमाप (वय ५५, रा. अरण्येश्वर, सहकारनगर), शुभम दिलीप पवार (वय २०, रा. अरण्येश्वर, सहकारनगर), आनंद उमाप (वय २२, रा. वडगाव, सिंहगड रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
उमाप टोळीने केलेल्या गोळीबारात मोजेश मलिकार्जुन शेकापूरे (वय २०, रा. बुद्धविहार सोसायटी, काकडे वस्ती, कोंढवा रोड) याच्या पाठीत गोळी लागली होती.

उमाप व शेकापूरे यांच्यामध्ये गुलटेकडीतील वर्चस्वाच्या कारणावरुन वाद झाले होते. सुमारे १५ दिवसांपूर्वी अल्पवयीनांनी गुलटेकडी परिसरात गोळीबार करुन दहशत माजविली होती. मागील वर्षीच्या नवरात्रीमध्ये राजू उमाप याच्या दाढीला हात लावून मस्करी केल्याच्या कारणावरुन त्यांच्यात भांडणे झाली होती. सागर मलिकार्जुन शेकापूर (वय २९), त्याचा भाऊ मोजेश शेकापूर, मित्र हसन अलिरजा शेख व निखील लगाडे हे ६ मार्च रोजी शिवशक्ती मंडळाची शिवजयंतीची मिरवणुक पाहून दुचाकीवरुन घरी जात होते. त्यावेळी आरोपी पाठीमागून पाठलाग करत आले. त्यांनी मोजेश व निखिल लगाडे यांना शिवीगाळ करुन आज यांना मारुन टाकून आज यांना जिवंत सोडायचे नाही, असे म्हणून बालाजी उमाप व राम उमाप यांनी त्यांच्याकडील पिस्टलमधून मोजेश याच्यावर दोन वेळा फायर केले. हर्षद ढेरे व सिद्धार्थ गायकवाड यांनी त्यांच्याकडील हत्याराने जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. मार्केटयार्ड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला.

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने व बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून मार्केटयार्ड पोलिसांनी राजू उमाप, शुभम पवार, आनंद उमाप यांना अटक केली.

या गुन्ह्यातील आरोपींचा गुन्हे शाखेतील वेगवेगळी पथके शोध घेत होती. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार मयुर भोकरे यांना माहिती मिळाली की, गोळीबारातील आरोपी नांदेड सिटी गेटजवळील जोगेश्वरी विसरच्या मागील बाजूस लपून बसले आहेत. त्यांच्या जवळ पिस्तुल असून पोलीस पथकावर गोळीबार करणार असल्याचे समजले. पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी या परिसराला चारही बाजूने घेराव घालून छापा टाकून बालाजी उमाप, साहिल चव्हाण यांना पकडले. त्यांच्याकडून विदेशी बनावटीचे पिस्तुल, जिवंत काडतुसे, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, मनोज पाटील, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त आयुक्त राहुल आवारे, शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप, विश्वजीत काईंगडे, पोलीस निरीक्षक सुनिता नवले, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर कटारे, सिद्धनाथ खांडेकर, अश्विनी कट्टे, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, सुनिल भापकर, पोलीस अंमलदार थोरात, कौस्तुभ जाधव, राऊत, किरण जाधव, जेधे, प्रविण तायडे, अमरनाथ लोणकर, संदिप सूर्यवंशी तसेच सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळगावे, पोलीस हवालदार दयानंद तेलंगे, मयुर भोकरे, अमर पवार, राजेंद्र लांडगे, रणजीत फडतरे, रहीम शेख यांनी केली आहे.

You may have missed