Pune Crime News | पिस्तुलाचा धाक दाखवुन जबरी चोरी करणारे मोक्क्यातील फरार दोघा गुंडांना गुन्हे शाखेच्या युनिट 4 च्या पथकाने केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | पिस्तुलाचा धाक दाखवुन जबरी चोरी करणारे आणि मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या दोघा फरार गुंडांना गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने जेरबंद केले आहे.
संतोष सुरेश भालेराव Santosh Suresh Bhalerao (वय २१, रा. विठ्ठल मंदिरामागे, सोमेश्वरवाडी, पाषाण) आणि आकाश ऊर्फ आक्की देवकर Akash Alias Akki Devkar (वय २०, रा. बोराडे वस्ती, मोशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
गुन्हे शाखेतील युनिट ४ चे पथक फरारी आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार अजय गायकवाड व वैभव रणपिसे यांना बातमी मिळाली की, मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी संतोष भालेराव हा आकुर्डी येथील रमाईनगर येथे येणार आहे. या बातमीच्या अनुषंगाने पोलिसांनी खंडोबा माळ येथे जाऊन संतोष भालेराव याला ताब्यात घेतले.
पोलीस अंमलदार विशाल इथापे व नागेशसिंग कुंवर यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मोक्कातील फरार आरोपी आकाश देवकर हा औंध येथील इंदिरा वसाहत येथे येणार आहे. या बातमीप्रमाणे पोलिसांनी सापळा रचून आकाश देवकर याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध २०२४ मध्ये चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात पिस्तुलाचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याचा गुन्हा दाखल होता. पुढील कारवाईसाठी त्यांना चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, पोलीस अंमलदार प्रविण राजपुत, अजय गायकवाड, प्रविण भालचिम, सुभाष आव्हाड, विठ्ठल वाव्हळ, विशाल इथापे, जहागिर पठाण, अमजद शेख, नागेशसिंग कुंवर व वैभव रणपिसे यांनी केली आहे.
