Pune Traffic Updates | विद्यापीठ चौकातील दुमजली पुलाच्या उद्घाटनानंतर दुहेरी वाहतूक पूर्ववत ! पाषाण व बाणेर रोड, अभिमान श्री सोसायटी रोडवर आता दुहेरी वाहतूक
पुणे : Pune Traffic Updates | गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) मेट्रो मार्गिका, तसेच दुमजली उड्डाणपुलाच्या उद्घाटनानंतर पाषाण, बाणेर, अभिमानश्री रस्त्यावरील एकेरी वाहतुकीचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. या भागातील दुहेरी वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.
या भागातील मेट्रो मार्गिकेचे काम, तसेच दुमजली उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. मेट्रो मार्गिकेचे काम सुरू झाल्यानंतर विद्यापीठ चौकात वाहतूक बदल करण्यात आले होते. पाषाण रस्ता, बाणेर रस्ता, अभिमानश्री सोसायटी रस्ता परिसरात दुहेरी वाहतूक रद्द करून तेथे एकेरी वाहतूक सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. विद्यापीठ चौकातील काम पूर्ण झाल्यानतंर दुहेरी वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
विद्यापीठ चौक ते अभिमानश्री सोसायटी ते बाणेर रस्त्यावरील वाहतूक दुहेरी करण्यात आली आहे. पाषाणकडून अभिमानश्री सोसायटी ते विद्यापीठ चौक दरम्यानची वाहतूक दुहेरी करण्यात आली आहे. अभिमानश्री सोसायटीतून पाषाण आणि बाणेरकडे जाणारा रस्ता दुहेरी करण्यात आला आहे. बाणेर फाट्याकडून येणारी, तसेच अभिमानश्री सोसायटीतून पाषाणकडे जाणा?्या वाहनांनी सकाळनगर परिसरातून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जावे, असे वाहतूक पोलिसांनी कळविले आहे.
