Bapu Pathare MLA | लोहगाव-खंडोबा माळ रस्त्यावरील धोकादायक विद्युत पोल हटवून तारा भूमिगत; आमदार बापूसाहेब पठारे यांच्या पाठपुराव्याला यश

Bapu Pathare MLA | Removing dangerous electric poles on Lohegaon-Khandoba Mal road and laying wires underground; Success in the pursuit of MLA Bapusaheb Pathare

पुणे: Bapu Pathare MLA | लोहगाव परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत लोहगाव-खंडोबा माळ रस्त्याच्या मध्यभागी असलेला धोकादायक विद्युत पोल हटवून विद्युत तारा भूमिगत करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

यापूर्वी रस्त्याच्या मध्यभागी असलेला विद्युत पोल अनेक वर्षांपासून नागरिकांसाठी धोकादायक ठरत होता. या पोलमुळे वाहनचालकांना मोठा अडथळा निर्माण होत होता. विशेषतः शालेय विद्यार्थी, महिला, वृद्ध नागरिक तसेच पीएमपीएमएल बस व इतर वाहनांना ये-जा करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. संभाव्य अपघातांचा धोका लक्षात घेऊन परिसरातील नागरिकांनी हा पोल हटवण्याची मागणी केली होती.

नागरिकांच्या मागणीची दखल घेत आमदार बापूसाहेब पठारे यांनी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या तसेच हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार संबंधित विभागाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत धोकादायक विद्युत पोल हटवून विद्युत तारा भूमिगत करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

सदरच्या कामामुळे आता या मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत झाली असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोल हटवल्यामुळे संभाव्य अपघातांचा धोका देखील मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

“लोहगाव व परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अशा प्रकारच्या समस्या मार्गी लावण्यासाठी पुढेही सातत्याने प्रयत्न सुरू राहतील”, हे काम पूर्ण करण्यासाठी जागा मालकांनी केलेले सहकार्य आणि महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री दीपक राव पाटील, उपकार्यकारी अभियंता आणि शाखा अभियंता श्री बेंद्रे यांचे उत्तम सहकार्य झाले त्याबद्दल या सर्वांचे धन्यवाद अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केली.

लोहगाव येथील खंडोबा माळ रस्त्याने पीएमपीएल बस सेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. खंडोबा माळ रस्त्यातील धोकादायक विद्युत पोल हटविल्यामुळे या मार्गावर बस सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती आमदार बापूसाहेब पठारे यांनी दिली.

You may have missed