Pune Crime News | चेष्टा मस्करीतून वाद झाल्याने आर्किटेक्ट तरुणाच्या पोटात चाकुने वार करुन केला खुन, तिघांना अटक  

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | दुचाकीवरुन जाणार्‍याला शब्ब्या म्हणून हाक मारली. चेष्टा मस्करी तून वाद होऊन त्यात टोळक्याने आर्किटेक्ट असलेल्या तरुणावर चाकूने वार करुन त्याचा खुन केल्याची घटना कॅम्पातील न्यू मोदीखाना येथे घडली.

फैसल फारुख खान (वय ३०, रा. कौसरबाग, कोंढवा) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे.

लष्कर पोलिसांनी अली अब्बास अश्रफअली सय्यद Ali Abbas Ashraf Ali Syed (वय २५, रा. चुडामण तालीम, भवानी पेठ), सोहेल युसुफ तांबोळी Sohail Yusuf Tamboli (वय २२, रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर), अश्रफअली गफार सय्यद Ashraf Ali Ghaffar Syed (वय ५५, रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या तीन साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे ही घटना न्यू मोदीखाना मस्जिदजवळ मंगळवारी १० मार्च रोजी रात्री सव्वा दहा वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैसल खान हा अर्किटेक्ट म्हणून काम करत होता. तो इतरांबरोबर न्यू मोदीखाना मस्जिदजवळ गप्पा मारत उभा होता. दुचाकीवरुन आरोपी जात असताना फैसल याने शब्ब्या अशी एकाला हाक मारली. चेष्टा मस्करीत मारलेल्या हाकेमुळे दुचाकीवरील तिघे जण फैसल जवळ आले. त्यांनी तु अशी हाक का मारली, अशी विचारणा केली. त्यातून त्यांच्यात वाद झाला. तेव्हा त्यांनी फोन करुन आणखी एकाला बोलावून घेतले. तो चाकू घेऊन आला. त्यांनी फैसलला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. फैसल याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले. परंतु, अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याचा उपचार सुरु असताना मृत्यु झाला. लष्कर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस तपास करीत आहेत.

You may have missed