Pune Crime News | विटकर टोळीतील दुसर्‍या भावालाही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली एम पी डी ए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई

Pune Crime News | Police Commissioner Amitesh Kumar has also taken action to detain another criminal of the Vitkar gang under the MPDA Act.

पुणे : Pune Crime News |  वडारवाडीमध्ये दहशत निर्माण करणार्‍या विटकर टोळीतील विजय विटकर याला काही महिन्यांपूर्वी स्थानबद्धतेची कारवाई केल्यानंतर आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दुसर्‍या भावाला एम पी डी ए कायद्यान्वये कारवाई करुन स्थानबद्ध केले आहे.

अजय चंद्रकांत विटकर Ajay Chandrakant Vitkar (वय २४, रा. हरिहरेश्वर सोसायटीसमोर, जुनी वडारवाडी) असे कारवाई केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. अजय आणि विजय विटकर या विटकर टोळीची वडारवाडी परिसरात दहशत आहे. त्यामुळे काही महिन्यापूर्वी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी विजय विटकर याच्यावर एम पी डी ए कायद्यान्वये कारवाई करुन बुलढाणा कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे.

अजय विटकर याच्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मागील ५ वर्षामध्ये त्याच्याविरुद्ध ८ गुन्हे दाखल आहेत. २०२२ मध्ये त्याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. वडारवाडी परिसरात त्याची दहशत असल्याने तत्कालीन पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. असे असताना तो पुन्हा वडारवाडीमध्ये आल्याचे समजल्यावर पोलिसांनी सापळा रचून त्याला वडारवाडीतील पठाण गल्लीत गेल्या वर्षी पकडले होते. त्यावेळी त्याच्याकडे एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे सापडली होती. त्यामुळे चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी एम पी डी ए कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांना सादर केला होता.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन अजय विटकर याला एक वर्षासाठी चंद्रपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनिकांत, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक अश्विनी ननवरे, सहायक पोलीस आयुक्त अनिकेत पोटे, अमोल धस, पोलीस उपनिरीक्षक उमेश कोळी, महिला पोलीस हवालदार जाधव, पोलीस अंमलदार संदिप ठोसर, पालांडे, हवालदार वाघवले, मोमीन, दांगडे, शिर्के, तांदळे, शिर्के, गिरंगे, कांबळे यांनी केली आहे.

You may have missed